जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 3 जण ठार

जम्मू -काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, या घटनेत तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 3 जण ठार
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 13, 2025 | 3:22 PM

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांनी आपला जीव गमवाला तर अनेक जण जखमी झाले. दरम्यान पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता संपूर्ण जम्मू काश्मीरमध्येच मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.सुरक्षा बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. तसेच अनेक ठिकाणी सध्या सर्च ऑपरेशन देखील सुरू आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास पुन्हा एकदा सीमावर्ती भागामध्ये पाकिस्तानचे ड्रोन दिसल्याची माहिती समोर आली होती.

दरम्यान आज जम्मू -काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यामध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, या घटनेत तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. शोपियनमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती, मिळालेल्या माहितीनुसार सैन्यानं दहशतवाद्यांना घेराव घातला, यावेळी झालेल्या चकमकीमध्ये काही मिनिटांमध्येच एक दहशतवादी ठार झाला तर त्यानंतर दोन तास सुरू असलेल्या चकमकीमध्ये आणखी दोन दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर येत आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर आता जम्मू -काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे, काश्मीरमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. सर्च ऑपरेशन सुरू असतानाच मंगळवारी दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. दोन्ही बाजुंनी जोरदार फायरिंग झाली. या चकमकीमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे, हे दहशतवादी लश्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी सबंधित असल्याची महिती समोर आली आहे. या परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती, त्यानंतर या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं, या दरम्यान झालेल्या चकमकीमध्ये तीन दहशतवादी ठार झाले आहेत.

दरम्यान पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये स्थानिकांचा देखील हात असावा असा संशय व्यक्त करण्यात येत होता, या पार्श्वभूमीवर देखील हल्ला झाल्यानंतर अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. तर दोनच दिवसांपूर्वी पोलिसांनी दक्षिण काश्मीरमध्ये मोठी कारवाई केली होती, अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले,  यावेळी देखील काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं.