सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेशात पाहा यंदा भाजपला किती जागा? काय म्हणतोय ओपनियन पोल

देशातील सर्वाधिक जागा असलेल्या राज्यात भाजपला किती जागा मिळत आहेत. उत्तर प्रदेशातील ओपनियन पोलनुसार पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात भाजपला मोठी आधाडी मिळताना दिसत आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याची शक्यता आहे. पाहा भाजपला किती जागांवर विजय मिळू शकतो.

सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेशात पाहा यंदा भाजपला किती जागा? काय म्हणतोय ओपनियन पोल
| Updated on: Apr 16, 2024 | 7:42 PM

Opinion Poll : देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमध्ये जो पक्ष सर्वाधिक जागा जिंकतो तो दिल्लीत सत्तेत येतो असं म्हटलं जातं. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील याच राज्यातून निवडणूक लढवली आणि २ वेळा विजयी झाले. आता लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजपला किती जागा मिळू शकतात. याचा ओपनियन पोल टीव्ही ९ ने जाहीर केला आहे. उत्तर प्रदेशात NDA लोकसभेच्या 80 पैकी 68 जागा मिळताना दिसत आहेत. तर इंडिया आघाडीला येथे केवळ 12 जागा मिळतील, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या 68 जागांपैकी 64 जागा भाजपच्या, दोन जागा आरएलडी आणि एडीएएलएस 2 जागा जिंकताना दिसत आहे.

उत्तरप्रदेशात कोणाला किती जागा?

इंडिया आघाडीला उत्तर प्रदेशात फक्त १२ जागांवर समाधानी मानावं लागू शकतं. समाजवादी पक्षाला यावेळी सपा 11 जागा मिळू शकतात तर काँग्रेसला केवळ 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचे खातेही उघडताना दिसत नाही. गाझियाबाद, इटाह, मिश्रीख, इटावा, फुलपूर, गोरखपूर, जालौन, झांसी, देवरिया, मैनपुरी, गाझीपूर या यूपीच्या अनेक महत्त्वाच्या जागा भाजप जिंकताना दिसत आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राज्यातून भाजपला सर्वात मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याचं ओपिनियन पोलमधून समोर येत आहे.

पुन्हा एकदा मोदी सरकार

यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब की बार ४०० पारचा नारा दिला आहे. तर भाजपला ३७० जागा देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. पण टीव्ही ९ च्या ओपिनियन पोलनुसार एनडीएला देशात एकूण 543 जागांपैकी एनडीएला देशात 362 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यापैकी भाजपला 319 जागा मिळू शकतात. मित्रपक्षाला 43 जागा मिळू शकतात. सर्वेक्षणानुसार इंडिया आघाडीला 149 जागा मिळू शकतात. त्यापैकी काँग्रेसला 49 जागा मिळू शकतात आणि आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या पक्षांना 100 जागा मिळू शकतात. याशिवाय 32 जागा इतरांना जाऊ शकतात.