
पाकिस्तानमधून भारतात आलेली सीमा हैदर पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे, सीमा हैदर पाकिस्तानमधून येऊन इथे सचिन मिना सोबत राहत आहे, सीमा हैदर ही कायम समाज माध्यमांवर चर्चेचा विषय असते. सीमा हैदरचं वैयक्तिक आयुष्य ते तिने घेतलेले कौटुंबीक निर्णय या सर्वांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असते. सीमा हैदराच्या प्रत्येक पोस्टवर यूजर्स आपली प्रतिक्रिया देत असतात. दरम्यान आता सोशल मीडियावर सीमा हैदर आणि सचिनच्या नव्या घरातील गृहप्रवेशाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सचिन आणि सीमा आपल्या नव्या घरात गृहप्रवेश करताना दिसत आहेत.विशेष म्हणजे सीमा हैदर बेबी बंपसह ढोल ताशांच्या गजरात घरात प्रवेश करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, यावर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे, काही जणांनी सचिनचं अभिनंदन केलं आहे, तर काही जणांनी खोचक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सोशल मीडीया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @seema____sachin10 नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सीमा हैदर बेबी बंपसह आपल्या नव्या घरात प्रवेश करत आहे. सीमा आणि सचिन यांच्या गृहप्रवेशावेळी बाहेर ढोल ताशा वाजत आहे. यावेळी सचिन मीणा देखील खूप आनंदी दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सचिनच्या हातामध्ये एक झाडू देखील दिसत आहे, सचिनवर देखील अनेकांनी कमेंटस् केल्या आहेत.
या व्हिडीओमध्ये सीमा एखाद्या नव्या नवरी सारखी सजलेली दिसत आहे. सचिन देखील बूट, सूट अशा वेशामध्ये पहायला मिळत आहे. त्यानंतर सीमा आणि सचिन या दोघांनी ढोल ताशाच्या गजरामध्ये आपल्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. सचिन या व्हिडीओमध्ये नाचताना देखील दिसत आहे. दरम्यान या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एका यूजर्सने म्हटलं आहे की, हे पहिलं असं प्रकरण असेल ज्यामध्ये मुलं स्वत: आपल्या आईच्या लग्नात सहभागी झाले आहेत.