भरधाव स्कॉप्रिओ दुभाजकाला धडकली, सात इंजिनिअर तरूणांचा मृत्यू, तीन जखमी

| Updated on: May 29, 2023 | 12:45 PM

या स्कॉर्पिओ व्हॅनमध्ये आसाम इंजिनिअरींग कॉलेज दहा विद्यार्थी प्रवास करीत होते. ही स्कॉर्पिओ व्हॅन त्यांनी भाड्याने घेतली होती. तिचा वेग जास्त असल्याने हा अपघात घडल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

भरधाव स्कॉप्रिओ दुभाजकाला धडकली, सात इंजिनिअर तरूणांचा मृत्यू, तीन जखमी
guwahati accident
Image Credit source: socialmedia
Follow us on

गुवाहाटी : भरधाव स्कॉर्पिओ कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या दुभाजकावर आदळून आसाम इंजिनिअरींग कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली आहे. या अपघातात तीन इंजिनिअरींगचे जखमी झाले आहेत. ही घटना गुवाहाटीच्या जलुकबरी परीसरात घडली आहे. या गाडीचा चालक आणि जखमी विद्यार्थ्यांवर नजिकच्या रुग्णालयात उपचार होत आहेत. दरम्यान, या अपघातातील मृत्यूंबद्दल आसामच्या मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

गुवाहाटीच्या जलुकबारी परीसरात सोमवारी पहाटे स्कॉर्पिओ चालकाच्या नियंत्रण सुटल्याने घडलेल्या भीषण दुर्दैवी अपघातात आसाम इंजिनिअरींग कॉलेजच्या सात विद्यार्थी ठार झाल्याचे वृत्त आहे. स्कॉर्पिओ रजिस्ट्रेशन क्र. AS 01 GC 8829 ही वेगाने जात असताना तिच्या ड्रायव्हरचे चालकाचे नियंत्रण सुटून दुभाजक ओलांडून गाडी बाजूच्या लेनवरील गुवाहाटीकडून जलुकबारी फ्लायओव्हर रोडवर येणाऱ्या बोलेरो डीआय पिकअप व्हॅनवर आदळली. सोमवारी पहाटे एक वाजता हा अपघात झाला.

या स्कॉर्पिओ व्हॅनमध्ये आसाम इंजिनिअरींग कॉलेज दहा विद्यार्थी प्रवास करीत होते. ही स्कॉर्पिओ व्हॅन त्यांनी भाड्याने घेतली होती. तिचा वेग जास्त असल्याने हा अपघात घडल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या अपघातातील जखमी विद्यार्थ्यांना गुवाहाटी मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे दाखल करण्यात करण्यात आले आहे. जखमींची अवस्था चिंताजनक असल्याचे समजते. या अपघातात अरबिंदम भल्लाळ ( गुवाहाटी ), नियोर डेका ( गोलघाट ), कौशिक मोहन (चराईदेव ), उपांगशू सरमाह ( नागांव ), राजकिरण भुयान ( माजुली ) , इमोन गयान ( दिब्रुगड ) आणि कौशिक बरुआ (मंगलडोई ) अशी मृतांची नावे आहेत. तर जखमींचे नावे अर्पण भुयान ( जोरहाट ), अर्नब चक्रबोर्ती ( बोंगईगांव ) आणि मृणमोय बोराह ( जोरहाट) अशी आहेत.

कॉलेज निवडणूकांत पराभव

दरम्यान, बोलेरो डीआय पिकअप व्हॅनमधील जखमी मुझम्मील हक, युसूफ अली आणि रजीब अली यांच्यावर देखील गुवाहाटी मेडीकल कॉलेज रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील मृतांमधील दोन विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत पराभव झाल्याची माहिती समोर आली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करीत मुलांच्या पालकांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे म्हटले आहे.