Sharad pawar : ममता बॅनर्जी शरद पवारांना भेटल्यानंतर पहिल्यांदाच पवार-सोनिया गांधी भेट, चर्चा गुलदस्त्यात

ममता बॅनर्जी मुंबईत येऊन शरद पवारांची भेट घेऊन गेल्यानंतर पहिल्यांदाच पवार आणि सोनिया गांधीची भेट झाली आहे.

Sharad pawar : ममता बॅनर्जी शरद पवारांना भेटल्यानंतर पहिल्यांदाच पवार-सोनिया गांधी भेट, चर्चा गुलदस्त्यात
| Edited By: | Updated on: Dec 14, 2021 | 7:29 PM

नवी दिल्ली : सध्या दिल्लीतल्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कारण सोनिया गांधींची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली आहे. ही भेट पूर्वनियोजित असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. या बैठकीला संजय राऊतही उपस्थित होते. तसेच फारूक अब्दुल्ला आणि मल्लिकार्जुन खर्गेही बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे पुन्हा राजकीय हलचाली वाढल्याचं पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ममता बॅनर्जी मुंबईत येऊन शरद पवारांची भेट घेऊन गेल्यानंतर पहिल्यांदाच पवार आणि सोनिया गांधीची भेट झाली आहे.

ममतांच्या भेटीनंतर पवार-सोनिया पहिली भेट

काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत आल्या होत्या, त्यावेळी त्या शरद पावरांना भेटल्या होत्या. त्या भेटीनंतर राज्यातले राजकारण जोरादार तापले होते, कारण ममता बॅनर्जी यांनी राहुल गाधी यांच्यासह काँग्रेसवर टीका केली होती. त्यामुळे राज्यातल्या काँग्रेस नेत्यांकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यात आले होते.

उद्या पुन्हा दिल्लीत बैठक

आम्ही एकत्रित काम करणार आहोत, उद्या आमच्या पुन्हा बैठक होणार आहे, उद्याच्या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
तसेच आमची आजची बैठक पूर्वनियोजित होती, राजकीय स्वरुपाची बैठक असली तरी अनेक गोष्टी सांगता येत नाही, पुढची रणनिती काय करता येईल याची चर्चा झाली, अशीही माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण होते

आजच्या बैठकीला उद्धव ठाकरे यांना आमंत्रण होतं, मात्र ते प्रवास करू शकत नाहीत, त्यामुळे शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून मी गेलो होतो. अशी प्रतिक्रिया बैठक संपल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. त्यामुळे या बंद दाराआडच्या बैठकीतली चर्चा गुलदस्त्यात आहे.

Crime : विनाकपड्यांवरच महिलेची चौकशी, आता भरावी लागणार २२ कोटींची नुकसानभरपाई!

INDvSA: रोहित दुखापतग्रस्त असल्याने सलामीच्या जागेसाठी ‘या’ तिघांमध्ये चुरस

Mira Bhayandar : मॅट्रीमनी साइटवरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तरुणाची फसवणूक