गर्ल्स हॉस्टेलमध्ये नको ते घडलं ! बाथरूममध्ये लपवलेली अशी वस्तू ज्यामुळे… मुली फक्त रडायच्याच राहिल्या; असं काय घडलं?

गोरखपूरमधील एका प्रायव्हेट गर्ल्स हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनींच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. बाथरूममध्ये छुपा कॅमेरा असलेला मोबाईल सापडला, ज्यातून विद्यार्थिनींचे व्हिडिओ रेकॉर्ड होत असल्याचा आरोप आहे. हॉस्टेल वॉर्डनवर हा मोबाईल लपवल्याचा आरोप असून, तिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गर्ल्स हॉस्टेलमध्ये नको ते घडलं ! बाथरूममध्ये लपवलेली अशी वस्तू ज्यामुळे... मुली फक्त रडायच्याच राहिल्या; असं काय घडलं?
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Sep 10, 2026 | 3:12 PM

Gorakhpur News : उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यात विद्यार्थिनींची सुरक्षितता आणि प्रायव्हसीचा भंग करणारा एक अतिशय गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कँट ठाणे क्षेत्रातील मोहद्दीपुर येथील एका प्रायव्हेट गर्ल्स हॉस्टेलच्या बाथरूममध्ये कॅमेरा सुरू असलेला मोबाईल फोन आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली. हॉस्टेलच्या महिला वॉर्डनने बाथरूममध्ये हा मोबाईल लपवून ठेवला होता आणि त्याचा कॅमेरा सुरू होता, असा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. हॉस्टेलमधील विद्यार्थिनी फ्रेश होताना, स्नान करताना त्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मोबाईल ताब्यात घेतला. महिला वॉर्डनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिची चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण गोरखपूरमधील कॅन्ट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहद्दीपूर परिसरातील आहे. या हॉस्टेलमध्ये शहरातील विविध महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सुमारे 26 विद्यार्थिनी राहतात. हॉस्टेलमध्ये एकूण 20 खोल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच हॉस्टेलमध्ये राहायला आलेली एक नवीन विद्यार्थिनी 8 सप्टेंबर रोजी फ्रेश होण्यासाठी कॉमन बाथरूममध्ये गेली होती. त्यावेळी तिची नजर अचानक बाथरूममध्ये लपवून ठेवलेल्या एका अँड्रॉइड मोबाईल फोनवर पडली. त्या मोबाईलचा कॅमेरा सुरू होता आणि तो थेट टॉयलेटकडे वळवण्यात आला होता. सतर्क विद्यार्थिनीने तातडीने आपल्या मोबाईलमधून लपवून ठेवलेल्या त्या फोनचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यानंतर तिने बाहेर येऊन हॉस्टेलमधील इतर विद्यार्थिनींना या प्रकाराची माहिती दिली.

डायल 112 वर दिली माहिती

बाथरूममध्ये कॅमेरा लावलेला मोबाईल आढळल्याची माहिती पसरताच हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांनी जोरदार गोंधळ घालत तातडीने आपल्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली. काही विद्यार्थिनींनी संपूर्ण घटनाक्रम आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर त्यांनी डायल 112 वर पोलिसांना माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीआरव्ही आणि कॅन्ट पोलीस ठाण्याचे पथक रात्री सुमारे 12 वाजता हॉस्टेलमध्ये पोहोचलं. पोलिसांनी विद्यार्थिनी तसेच महिला वॉर्डनची चौकशी केली. चौकशीदरम्यान बाथरूममध्ये सापडलेला मोबाईल वॉर्डनचा असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितलं. तपासणीदरम्यान मोबाईलमध्ये अनेक विद्यार्थिनी आंघोळ करताना आणि फ्रेश होत असतानाचे कथित व्हिडिओ आढळल्याचे सांगण्यात आले. कोणताही आक्षेपार्ह कंटेंट लीक होऊ नये, यासाठी पोलिसांच्या उपस्थितीत हे व्हिडिओ डिलीट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

विद्यार्थिनींनी दिलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे बुधवारी सायंकाळी आरोपी वॉर्डनविरोधात कॅन्ट पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र या प्रकारामुळे प्रचंड खळबळ माजली असून विद्यार्थिनींची प्रायव्हसी आणि त्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us