CM पदावर सिद्धरामय्या कायम, डीके शिवकुमार यांची माघार का? फॉर्म्युला काय? जाणून घ्या

कर्नाटकातील राजकीय चित्र पूर्णपणे पालटलं. काँग्रेसने नवा फॉर्म्युला आणला. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला कर्नाटकात येताच सर्व काही स्पष्ट झाले असून सिद्धरामय्याच मुख्यमंत्री राहतील, हे निश्चित झाले आहे. पण, यामागे गणित नेमकं काय आहे, हे जाणून घ्या.

CM पदावर सिद्धरामय्या कायम, डीके शिवकुमार यांची माघार का? फॉर्म्युला काय? जाणून घ्या
Siddaramaiah
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 03, 2025 | 6:49 PM

कर्नाटकातल्या राजकारणाकडे सध्या अवघ्या देशाचं लक्ष लागून आहे. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद, अशी चर्चा होती, म्हणजेच आधी सिद्धरामय्या अडीच वर्ष आणि नंतर डीके शिवकुमार अडीच वर्ष मुख्यमंत्री होतील, असं असताना कर्नाटकातील राजकीय चित्र पूर्णपणे पालटलं आहे. सिद्धरामय्याच मुख्यमंत्री राहतील, हे निश्चित झाले आहे. हे सगळं झालं काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला कर्नाटकात आल्यानंतर.

काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला कर्नाटकात येताच सिद्धरामय्याच मुख्यमंत्री राहतील, हे निश्चित झाले. सुरजेवाला प्रसारमाध्यमांशी बोलत असताना डीके शिवकुमार देखील तिथेच उपस्थित होते, पण ते काहीच बोलले नाहीत. याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष होतं. दरम्यान, आता प्रश्न हा आहे की, सिद्धरामय्या यांनी आपली खुर्ची कशी वाचवली? की हा एक नवा फॉर्म्युला आहे, याविषयी पुढे विस्ताराने जाणून घेऊया.

कर्नाटक काँग्रेसमधील उलथापालथ सध्या तरी संपुष्टात येताना दिसत आहे. खरं तर कर्नाटकात सिद्धरामय्या यांना बदलून डीके शिवकुमार यांना नवे मुख्यमंत्री बनवण्याची चर्चा होती, पण आता डीके शिवकुमार यांनी माघार घेतली आहे. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात सामंजस्य घडवून आणण्यात काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यशस्वी झाले. पण, यामागे काँग्रेसचा नेमका फॉर्म्युला काय आहे, हे पुढे जाणून घ्या.

सिद्धरामय्या मुख्यमंत्री राहतील, असे सुरजेवाला यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले तेव्हा डीके शिवकुमारही तेथे उपस्थित होते, पण ते काहीच बोलले नाहीत. डीके शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदावरील आपला दावा तूर्तास सोडल्याचे स्पष्ट झाले आहे. डीके शिवकुमार यांनी माघार घेण्याचे कारण जाहीर करण्यात आलेले नाही, परंतु सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रिपदावर कायम ठेवण्यासाठी काय कारणे असू शकतात, हे पुढे जाणून घ्या.

काँग्रेसचा फॉर्म्युला काय असू शकतो?

1. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. डीके शिवकुमार यांना हे नको होते कारण त्यांना भीती होती की जर त्यांनी राजीनामा दिला तर सिद्धरामय्या आपल्या निकटवर्तीयांना नवीन प्रदेशाध्यक्ष बनवू शकतात, ज्यामुळे शिवकुमार यांची पक्षावरील पकड कमकुवत होईल.

2. सिद्धरामय्या यांच्या खुर्ची गमावण्याचे दुसरे कारण बिहार निवडणूकही असू शकते. खरं तर बिहार निवडणुकीपूर्वी मागास जातीतून आलेल्या नेत्याला मुख्यमंत्रीपदावरून हटवून काँग्रेसला बिहारमध्ये चुकीचा संदेश द्यायचा नाही कारण बिहारमधील 64 टक्के जनता मागास किंवा अतिमागास आहे.

3. डीके शिवकुमार यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी सुरू असून ते 2019 मध्ये तुरुंगातही गेले आहेत. डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करून भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकू इच्छित नाही. डीके शिवकुमार यांना थांबण्यास सांगण्यात येण्याचे हे देखील एक कारण असू शकते.

4. आरसीबीच्या विजयानंतर झालेल्या चेंगराचेंगरीला अजून बरेच दिवस उलटलेले नाहीत. याबाबत लोकांमध्ये अजूनही नाराजी आहे. डीके शिवकुमार यांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली होती. अपघाताचे कारण गर्दीचे ढिसाळ व्यवस्थापन असल्याचे सांगण्यात आले. अशा परिस्थितीत डीके शिवकुमार यांना खुर्ची न मिळण्याचे हे देखील एक कारण असू शकते.