बेकायदेशीर बार चालवण्याच्या आरोपांवर भडकल्या स्मृती इराणी, म्हणाल्या काँग्रेसकडून कोर्टात मागेन उत्तर.

| Updated on: Jul 23, 2022 | 7:44 PM

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी कागदपत्रे दाखवत स्मृती इराणी यांची मुलगी बार चालवत असल्याचा आरोप केला होता. हे सर्व काँग्रेस नेतृत्वाच्या इशाऱ्याने होत असल्याचा आरोपही स्मृती इराणी यांनी यावेळी केला.

बेकायदेशीर बार चालवण्याच्या आरोपांवर भडकल्या स्मृती इराणी, म्हणाल्या काँग्रेसकडून कोर्टात मागेन उत्तर.
स्मृती इराणी विरुद्ध काँग्रेस
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्ली – मुलगी बेकायदेशीर बार चालवते, या आरोपांवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शनिवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणात काँग्रेसकडून (Congress)कोर्टात उत्तर घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यांची मुलगी सध्या कॉलेज विद्यार्थिनी आहे, असे सांगत ती बार (bar)चालवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अमेठीच्या खासदार आमि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा दावा आहे की त्यांच्या मुलीला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी कागदपत्रे दाखवत स्मृती इराणी यांची मुलगी बार चालवत असल्याचा आरोप केला होता. हे सर्व काँग्रेस नेतृत्वाच्या इशाऱ्याने होत असल्याचा आरोपही स्मृती इराणी यांनी यावेळी केला.

आरटीआय माहितीच्या आधारे आरोप

काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी, स्मृती इराणी यांच्या मुलीला कारणे दाखवा नोटीस पाठवण्याची मागणी केली आहे, असे स्मृती इराणी यांनी सांगितले. पवन खेडा हे कागद दाखवत आहेत त्यात माझ्या मुलीचे नाव तरी आहे का, असा प्रश्न स्मृती इराणी यांनी विचारला आहे. आरटीआयच्या मिळालेल्या माहितीच्या आधारातून या प्रकरणात आपल्या मुलीचे नाव गोवण्यात येत आहे, असे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितले आहे. आरटीआयच्या या कागदपत्रांत आपल्या मुलीचे नाव आहे का, असा सवालही स्मृती इराणी यांनी केला आहे. आरटीआयने दिलेल्या उत्तरात आपल्या मुलीचे नाव आहे का, असा सवाल त्यांनी तीव्रतेने विचारला आहे.

कोर्टात काँग्रेसकडून उत्तर घेणार

काँग्रेस प्रवक्ते हसत असे सांगत होते की स्मृती इराणी या सोनिया आणि राहुल गांधी यांच्याविरोधात पत्रकार परिषद करतात. तर हो, आपण सोनिया आणि राहुल गांधी यांच्याविरोधात पत्रकार परिषदा घेतो आणि यापुढेही करत राहीन असे उत्तर स्मृती इराणी यांनी दिले आहे. या सगळ्या प्रकरणावर काँग्रेसकडून कोर्टात उत्तर मागेन असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा

जोइश इराणी यांच्यावर बार चालवत असल्याचा आरोप

स्मृती इराणी यांची मुलगी जोईश इराणी या गोव्यात सिली सोल्स कॅफे अँड बार नावाचे जे रेस्टॉरंट चालवतात, त्याचे लायसन्स बेकायदेशीर असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. बारच्या मालकांनी मद्य परवान्यासाठी ज्यांच्या नावाने त्याचे नूतनीकरण केले, त्यांचा १३ महिन्यांपूर्वी मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात वकील रोड्रीग्ज यांनी तक्रार केली आहे.

कोणत्या स्मृती इराणी खऱ्या – पवन खेडा

पवन खेडा यांनी ट्विट करुन कोणत्या स्मृती इराणी खऱ्या, असा प्रश्न काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी विचारला आहे. यापूर्वी १४ एप्रिल २०२२ रोजी स्मृती इराणी यांनी त्यांच्या मुलीच्या रेस्टॉरंटचे कौतुक केले होते. त्या स्मृती इराणी खऱ्या की आपल्या मुलीचे रेस्टॉरंटच नाही, असं सांगणाऱ्या स्मृती इराणी खऱ्या असे त्यांनी विचारले आहे.