महिलेला 3 वर्षात सातवेळा चावला साप, वाचली की मेली? नेमकं काय घडलं? वाचा…

बांदा येथील एका महिलेला 3 वर्षांत 7 वेळा साप चावला आहे. या महिलेला सातव्यांदा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

महिलेला 3 वर्षात सातवेळा चावला साप, वाचली की मेली? नेमकं काय घडलं? वाचा...
Women and snake
Image Credit source: Meta AI
| Updated on: Jul 20, 2025 | 7:23 PM

उत्तर प्रदेशातून विचित्र बातमी समोर आली आहे. बांदा येथील एका महिलेला 3 वर्षांत 7 वेळा साप चावला आहे. या महिलेला सातव्यांदा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. बिसांडा पोलीस स्टेशन हद्दीतील कोराही गावात ही घटना घडली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, येथील रोशनी नावाच्या महिलेला 3 वर्षांत 7 वेळा साप चावला आहे. सातव्यांदा साप चावल्यानंतर तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे शेजारील एका तरुणाने या महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहे. ही घटना सातव्यांदा घडल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

डॉक्टर काय म्हणाले?
याबाबत बोलताना जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर विनीत सचान म्हणाले की, ‘रोशनी या 36 वर्षीय महिलेला साप चावला आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या तीन वर्षांत तिला सात वेळा साप चावला आहे आणि प्रत्येक वेळी जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार केले जातात, त्यानंतर ती बरी होते. आत तिला सातव्यांदा साप चावला आहे, तिच्यावर उपचार सुरु असून सध्या तिची प्रकृती ठीक आहे.’

साप चावल्यास काय करावे?

शांत रहा: साप चावल्यानंतर घाबरू नका आणि त्याव्यक्तीला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

विषारी की बिनविषारी: शक्य असल्यास सापाचा फोटो काढा किंवा तो कसा आहे ते लक्षात ठेवा. यामुळे तो विषारी आहे की बिनविषारी ते समजेल, मात्र सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका.

चावा घेतलेली जागा स्थिर ठेवा: शरीराच्या ज्या भागाला साप चावला आहे, त्या भागाची हालचाल होऊ देऊ नका. भाग तो हृदयाच्या पातळीवर किंवा थोडा खाली ठेवा.

विषाचा प्रसार थांबवा: विषाचा प्रसार थांबवण्याचा प्रयत्न करा, हा भाग चांगला स्वच्छ करा.

वैद्यकीय मदत घ्या: साप चावल्यानंतर ताबडतोब रुग्णालयात जा. साप विषारी असल्यात औषधोपचाराची आवश्यकता असते.

अनावश्यक उपचार घेऊ नका: साप चावल्यावर घरगुती उपचार वापरू नका, याचा फायदा होत नाही, यामुळे प्रकृती आणखी खालावू शकते. साप चावल्यास ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या, यामुळे जीव वाचू शकतो.