जादूची छडी! आयुष्यात पुन्हा साप जवळ फिरकणार नाही, फक्त ही एक काठी जवळ ठेवा, दुरूनच पळून जातात

साप म्हटलं की अनेकांना भीती वाटते, मात्र आता भिण्याचं कारण नाही. जर तुम्हालादेखील सापांची भीती वाटत असेल तर तुम्ही देखील ही काठी तुमच्यासोबत ठेवू शकतात. यामुळे साप तुमच्या जवळ देखील येणार नाही.

जादूची छडी! आयुष्यात पुन्हा साप जवळ फिरकणार नाही, फक्त ही एक काठी जवळ ठेवा, दुरूनच पळून जातात
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 14, 2026 | 5:54 PM

भारतामध्ये सापाच्या हजारो प्रजाती आढळतात. त्यातील अनेक प्रजाती या बिनविषारी आहेत, भारतामध्ये केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच प्रजाती या विषारी आहेत. विषारी प्रजातीमध्ये मण्यार, फुरसे घोणस, आणि नाग या सापांचा समावेश होतो. मात्र जरी असं असलं तरी देखील दरवर्षी सर्पदंशामुळे अनेकांचा मृत्यू होतो. भारतामध्ये तर सर्पदंशामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात काम करताना देखील सर्पदंशाची भीती असतेच. तसेच अनेक भागांमध्ये शेतीला पाणी देण्यासाठी दिवसा वीज उपलब्ध नसते, रात्रीच्यावेळी लाईट उपलब्ध असल्यामुळे शेतकरी रात्रीच्या अंधारात पिकांना पाणी देतात, अशावेळी देखील सर्पदंशाचा धोका अनेक पटींनी वाढतो. अंधारामध्ये साप न दिसल्यानं सर्पदंश होऊ शकतो.

मात्र आज जगभरात प्रत्येक क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा विकास होत आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे रहाणीमान उंचावलं आहे, तसेच जगणं देखील अधिक सोपं झालं आहे, आता आपल्याला पूर्वी जेवढे कष्ट करावे लागत होते, तेवढे कष्ट करण्याची गरज उरली नाही. शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे आता साप, विंचू या सारख्या विषारी प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी मित्र नावाची एक काठी विकसीत करण्यात आली आहे. ही जर काठी तुमच्या हातात असेल तर तुमचं साप, विंचू या सारख्या विषारी प्राण्यांपासून संरक्षण होईल.

काय आहे वैशिष्ट्य?

ही एक काठी आहे, ज्या काठीला टॉर्च देखील बसवण्यात आला आहे, तसेच या काठीमध्ये असे काही सेन्सर बसवण्यात आले आहेत. ज्या परिसरात तुम्ही आहात तिथे कुठेही 100 मिटरच्या आत जर साप असेल तर या काठीचे सेन्सर सक्रिय होतात आणि काठीमध्ये कंपनाला सुरुवात होते, त्यामुळे तुम्हाला धोक्याची जाणीव होते, तुम्ही जेव्हा कुठे रात्रीच्या अंधारात फिरण्यासाठी गेलात तर ही काठी खाली टेकवायची आणि स्विच ऑन करायचा, जर कुठेही धोका जाणवला तर या काठीमध्ये आपोआप कंपनं निर्माण होतात, आणि तुमचं सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण होतं.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us