Sanjay Raut on Eknath Shinde | पोल्ट्रीत कोंबडीने अंडी उबवली आणि त्यातून 40 आमदार बाहेर आले!; राऊतांचा शिंदेंना टोला
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्ली दौऱ्यावर आहेत. दरम्यान, शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे प्रमुख असल्याचा दावा न्यायालयात केला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांचा दिल्ली दौरा चर्चेचा विषय ठरला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्ली दौऱ्यावर आहेत. दरम्यान, शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे प्रमुख असल्याचा दावा न्यायालयात केला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांचा दिल्ली दौरा चर्चेचा विषय ठरला आहे.
एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. संसदेत येण्यासाठी पंतप्रधानांकडे वेळ नाही, मात्र फुटीर खासदारांसोबत ब्रेकफास्ट बैठक घेण्यासाठी वेळ आहे, अशी बोचरी टीका राऊत यांनी केली. मोदी आणि शिंदे यांच्यात नेमकी काय चर्चा होणार, यावरही त्यांनी सवाल उपस्थित केला.
संजय राऊत म्हणाले की, मोदी आणि शिंदे यांच्या भेटीत ‘तू किती फोडलेस, मी किती फोडले आणि अजून किती फोडायचे’ यापलीकडे काही चर्चा असेल असे वाटत नाही. महाराष्ट्रातील उद्योग, मालमत्ता आणि विकासकामांबाबतही त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. अदानींना महाराष्ट्रात आणखी किती मालमत्ता द्यायची आणि आता विकण्यासाठी काय शिल्लक आहे, यावरच चर्चा होईल, असा टोला राऊत यांनी लगावला.
शिवसेना पक्षाच्या मालकीच्या मुद्द्यावरही राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचेच आमदार होते, असा दावा त्यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली असून, पक्ष उद्धव ठाकरे यांचा असल्याचे राऊत यांनी म्हटले. निवडणूक आयोगाने दबावाखाली निर्णय घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.
एकनाथ शिंदे यांनी ‘शिवसेना कोणाची, याचा निर्णय जनतेच्या न्यायालयात आधीच झाला आहे’, असे म्हटल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी नारायण राणे आणि राज ठाकरे यांची उदाहरणे दिली. पक्ष सोडल्यानंतर नारायण राणे यांनी स्वतःचा पक्ष काढला आणि राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यात नेतृत्वाची हिंमत असेल, तर त्यांनी स्वतःचा पक्ष काढून स्वतःच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असे आव्हान राऊत यांनी दिले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह दुसऱ्याच्या मदतीने मिळवून त्यावर निवडणुका लढवणे योग्य नसल्याचा आरोपही राऊत यांनी केला. शिवसेनेच्या मतांवर एकनाथ शिंदे यांचा अधिकार नसल्याचे सांगत त्यांनी शिंदे गटावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा, मोदींसोबतची भेट आणि सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
Published on: Aug 07, 2026 12:44 PM
पोल्ट्रीत कोंबडीने अंडी उबवली आणि त्यातून 40 आमदार बाहेर आले...
मुंबई लोकलमध्ये महिलेला मारहाण! पुरुषाने बेल्ट काढून धमकावलं
मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या ब्रेकफास्ट बैठकीत काय घडलं?
शिव्या देण्याचा अधिकार फक्त भाजपालाच आहे का? ठाकरेंचा सरकारवर घणाघात

