साप घरातच काय परिसरात सुद्धा फिरकणार नाहीत, फक्त लावा हे सुंदर पिवळ्या फुलांचं झाड

अनेकदा आपल्या घरात किंवा परिसरात कुठेही साप आढळून येतात. साप घरात आल्यामुळे वन्यजीव आणि मानवी संघर्ष देखील पहायला मिळतो. हे टाळण्यासाठी काही पांरपरिक उपाय देखील आपण करू शकतो.

साप घरातच काय परिसरात सुद्धा फिरकणार नाहीत, फक्त लावा हे सुंदर पिवळ्या फुलांचं झाड
snake
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 27, 2026 | 1:47 PM

साप हे नाव ऐकताच आपल्याला भिती वाटते. सापांमध्ये प्रामुख्याने दोन प्रकार पडतात, एक विषारी प्रजातींचे साप आणि दुसरा प्रकार म्हणजे बिनविषारी प्रजातीचे  साप. भारतामध्ये सापांच्या ज्या हजारो प्रजाती आढळू येतात त्यातील बहुतेक सापांच्या प्रजाती या बिनविषारीच आहेत. परंतु भारतामध्ये आढळणाऱ्या काही सापांच्या प्रजाती या अतिविषारी देखील आहेत. ज्यामध्ये चार प्रमुख प्रजातींचा समावेश होतो. यामध्ये नाग, मण्यार, फुरसे आणि घोणस या प्रमुख सापांच्या प्रजाती आहेत, या सापांच्या प्रजाती अतिविषारी असल्यामुळे त्यांना बिग फोर असं देखील म्हटलं जातं. विशेष म्हणजे या चारही प्रजाती महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आढळतात.

दरम्यान साप आपल्या घरात येऊ नये, यासाठी काही पारंपरीक उपाय देखील उपयोगाचे ठरतात, ग्रामीण भागातअनेकजण जर घर शेत वस्तीवर असेल तर घराभोवती काटेरी झाडं किंवा कुंपन करतात. सापांना काट्यांचा त्रास होतो, त्यामुळे साप सहसा अशा जागी फिरकत नाहीत. यापैकीच एक झाड आहे, ते म्हणजे काटेकोरांटीचं काटेकोरांटीच्या झाडाला सुंदर अशी पिवळी फुलं येतात. अनेकजण घराच्या भोवती शोभेचं झाड म्हणून काटेकोरांटी लावतात. मात्र याचा एक फायदा असा देखील आहे, की हे झाड सापांना घरापासून दूर ठेवते. या झाडाला काटे असतात, अनेकदा हे काटे वाऱ्यासोबत त्या परिसरात देखील पसरतात. यामुळे सहसा साप अशा परिसरात फिरकत नाहीत. या काट्यांचा त्यांना त्रास होतो.  ज्या ठिकाणी सारखे साप आढळून येतात, अशा ठिकाणी हे झाड लावल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.

Loading...

त्याचप्रमाणे साप घरात येऊ नये, यासाठी तुम्ही इतरही काही उपाय करू शकता, जसं की तुमच्या घराचा परिसर हा नेहमी स्वच्छ ठेवावा. या परिसरात गवत वाढू देऊ नये.  जर घराच्या आसपास कुठेही उंदरांचे बिळ असतील तर ती लगेच बुजून टाकावीत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे साप कधीही स्वत:च बिळ तयार करत नाही, तर तो उंदराने तयार केलेल्या बिळांमध्येच राहतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us