Cyber Crime : सावधान! जाहिरातीवर फक्त एक क्लिक अन् खात्यातून 98, 000 गायब! मोबाईलवर असा स्कॅम तुमच्यासोबतसुद्धा… काय आहे हा स्कॅम? वाचा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहिरात दिसली. ती खूप आवडली. म्हणून क्लिक केली तर, संपूर्ण बँक अकाउंट काही मिनिटांतच रिकामी झालं. तुम्हालाही मोठा फटका बसू शकतो. त्याआधी हा स्कॅम नेमका कसा होतो, जाणून घ्या...

Cyber Crime :  सावधान! जाहिरातीवर फक्त एक क्लिक अन् खात्यातून 98, 000 गायब! मोबाईलवर असा स्कॅम तुमच्यासोबतसुद्धा... काय आहे हा स्कॅम? वाचा
ONLINE SCAM
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 02, 2026 | 4:07 PM

जाहिरात की खात्यातून पैसे काढून घेण्यासाठीचा ट्रॅप?…जाहिरात आवडली म्हणून क्लिक केले अन् खात्यातून काही क्षणांतच हजारो रूपये गायब झाले. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील जोडप्याला जाहिरातीची भुरळ पडली आणि त्या लालसेपायी त्यावर क्लिक करणं त्यांच्या चांगलंच अंगाशी आलं.

काही दिवसांपूर्वीच हा प्रकार त्या जोडप्यासोबत घडला. जाहिरातीवर क्लिक केल्यामुळे एकाच्या बँक अकाउंटमधून थोडेथोडके नव्हे, तर तब्बल 98 हजार रुपये गायब झाले. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Loading...

ग्वाल्हेर येथील रूद्र पुरा येथे राहणाऱ्या जयप्रताप सिंग बाथम याची पत्नी नेहमीप्रमाणे जयप्रतापच्या मोबाइलवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रील्स बघत होती. रिल्स बघताना मध्येच एक जाहिरात आली. जाहिरात आवडली म्हणून बायकोने त्या जाहिरातीवर क्लिक केले. जाहिरातील ओपन केले. अन् रात्रभरात नवऱ्याच्या बँक खात्यातून 98 हजार रूपये गायब झाले.

जाहिरातीवर क्लिक केल्यावर मोबाइल अचानक हँग झाला. सगळे फंक्शन एकाच वेळी काम करणे बंद झाले. मोबाइल अचानक स्विच्ड ऑफ होऊन बंद झाला. सुरूवातीला जास्त रिल्स बघितल्यामुळे किंवा फोनमधे बिघाड असल्यामुळे फोन हँग झाला असावा असे त्या दोघांनाही वाटले. नंतर फोन रिपेअर केल्यावर सुरू देखील झाला. त्यानंतर अचानक रात्री बारा वाजता अकाउंटमधून 2970 रूपये कट झाले. आपण काही खर्च केला नसताना पैसे कट कसे झाले असा संशय त्यांना आला. त्यामुळे दाम्पत्यानं दुसऱ्या दिवशी सायबर हेल्पलाइन क्रमांकावर आपली तक्रार नोंदवली. बँकेत जाऊन स्टेटमेंट काढले अन् ते बघून जोडप्याच्या पायाखालची जमीन सरकली. एका रात्रीत यूपीआय पेंमेंटच्या मदतीने खात्यातून तब्बल तीन वेळा प्रयत्न करून 98,000 रूपये काढण्यात आले.

या प्रकरणी या दोघांनी पुरानी छावणी या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावण्यासाठी पोलिसांनी तपास सायबर पोलिसांकडे वर्ग केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us