Sonam Wangchuk : अभिजीत दिपकेंकडून आणखी एका आंदोलनाची घोषणा, दुसरीकडे सोनम वांगचुक यांना वेगळीच भीती

सोनम वांगचुक यांनी धक्कादायक दावा केल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी एन्काउंटरची भीती व्यक्त केली आहे.

Sonam Wangchuk : अभिजीत दिपकेंकडून आणखी एका आंदोलनाची घोषणा, दुसरीकडे सोनम वांगचुक यांना वेगळीच भीती
sonam wanghchuk
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 25, 2026 | 7:44 AM

अभिजीत दिपके यांनी आणखी एका आंदोलनाची घोषणा केली आहे. दुसरीकडे लडाखमध्ये आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी धक्कादायक दावा केला आहे. माझा कधीही एन्काउंटर होऊ शकतो, असा दावा सोनम वांगचुक यांनी केला आहे. वांगचुक यांनी सरकारवर देखील गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागितला आहे. लडाखच्या मुद्द्यांवर मौन बाळगल्याने राहुल गांधी यांनाही अनेक सवाल केले.

लडाखच्या हिंसाचाराच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झालं. या दिवसाचं औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात सोनम वांगचुक यांनी धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी जीवाला धोका असल्याचे सांगितले. देशातील जनतेला जागृत करण्याचं हे फळ मिळत असेल, तर मी परिणामाला सामोरे जायला तयार आहे. त्यांनी राजधानी दिल्लीत जून-जुलै महिन्यात आंदोलनादरम्यान वांगचुक यांनी उपोषण केलं होते.

वांगचुक यांनी म्हटलं की, ‘त्यांनी मला तुरुंगात टाकलं. काही लोक माझा एन्काउंटर होईल, अशी शक्यता व्यक्त करतात. खरंतर या घटनेने संपूर्ण देशातील जनता जागृत होईल. गोळीबार प्रकरणाचा न्यायालयीन चौकशी अहवाल सार्वजनिक केला पाहिजे. प्रसिद्ध केलं नाही. तर पोलीस गोळीबाराची स्वतंत्र्य चौकशीसाठी जनता न्यायाधिकरणाची स्थापना केली जाईल. वांगचुक यांनी पुढे म्हटलं की,मी लडाखच्या जनतेला सांगतो की, अमित शहा यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. लडाखमध्ये काही झालं, तर त्याची जबाबदारी अमित शहा यांनी घेतली पाहिजे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी स्थानिक तरुणांवर एके-47 सह स्वयंचलित शस्त्रांचा वापर केला. तर वांगचुक पुढे म्हणाले, ‘राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या विरोधात शस्त्रांचा वापर कसा केला जाऊ शकतो? असा सवाल केला होता. त्यांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मी त्याचे समर्थन करतो’.

वांगचुक पुढे म्हणाले, ‘राहुल गांधी यांनी दिल्लीच्या घटनेवरून अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर लडाखमध्ये घडले, त्याचे काय? लडाखमध्ये एके-47 चा वापर झाला. काहींचा डोक्यात, छातीत गोळ्या लागून लोकांचा मृत्यू झाला. खरंतर लडाखने भारतासोबत राहण्याचा निर्णय घेतला. लडाखमधील जनतेचा लोकशाही आणि सन्मानाने जगण्याच्या अधिकारावर विश्वास होता. लडाखमध्ये 2014 ते 2019 पर्यंत सर्व काही सुरळीत होतं. परंतु अमित शहा हे गृहमंत्री झाल्यापासून सर्वत्र दंगली घडत आहे. काही ठिकाणी अशांतता निर्माण होत आहे. लडाखमध्ये देण्यात आलेली आश्वासने मोडली गेली आहेत’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us