सोनिया गांधींच्या राजकीय एन्ट्रीला होता राहुल-प्रियांकांचा विरोध; पंतप्रधानपद नाकारण्यामागच्या कारणाचाही केला उलगडा

काँग्रेसच्या सोनिया गांधी यांच्या राजकीय एन्ट्रीला दोन्ही मुलांचा विरोध होता. त्यांनी पंतप्रधानपद नाकारण्यामागचं कारण देखील सांगितलं.

सोनिया गांधींच्या राजकीय एन्ट्रीला होता राहुल-प्रियांकांचा विरोध; पंतप्रधानपद नाकारण्यामागच्या कारणाचाही केला उलगडा
Sonia gandhi news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 08, 2026 | 9:17 AM

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी त्यांच्या ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रात अनेक राजकीय निर्णयांचा उलगडा केला आहे. त्यांना राजकारणाविषयी तिटकरा होता, असेही त्यांनी सांगितले. राजकारणाचं जग, त्यातील महत्त्वाकांक्षा आणि लोभ, ढोंगीपणा आणि सत्तेच्या खेळासोबत अपरिहार्यपणे येणारी विश्वासघातकी वृत्तीचा तिटकारा होता. मी राजकारणात येऊ नये, असं राहुल आणि प्रियांका यांचं मत होतं. दोघांनी याबाबत माझ्याशी चर्चा केली होती. कारण त्यांना मला गमवायचं नव्हतं, असा खुलासा सोनिया गांधी यांनी केला.

सोनिया गांधींनी लिहिलेलं आत्मचरित्राची जोरदार चर्चा होत आहे. आत्मचरित्रावरून एका मुलाखतीत सोनिया गांधींनी म्हटलं की, 1990 च्या दशकात उत्तरार्धात काँग्रेस पक्ष कठीण काळातून जाताना पती राजीव गांधी, सासू इंदिरा गांधी यांची छायाचित्रे पाहताना वेदना, अपराधीपणाची भावना एकाचवेळी जाणवायची. माझा स्वत:शीच संघर्ष सुरू होता. राजकारणाचे जग, महत्वाकांक्षा, लोभ, ढोंगीपणा , सत्तेच्या खेळ, विश्वासघातकी वृत्तीविषयी तिटकारा होता’.

Loading...

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us