ठाकरे-शिंदे एकत्र आले तीच खरी दिवाळी… राष्ट्रवादीनंतर शिवसेना एकत्र येणार? या बड्या नेत्याचे मोठे सूचक वक्तव्य
Uddhav Thackeray-Eknath Shinde Shivsena: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी राजकारणात धुराळा उडवून दिला असतानाच आता शिवसेनेची दोन शक्कलंही एकत्र यावीत असा सूर आवळण्यात येत आहे. ठाकरे-शिंदे एकत्र आले तीच खरी दिवाळी, असे मोठे वक्तव्य शिंदे सेनेच्या या शिलेदाराने केले आहे.

जितेंद्र बैसाणे, प्रतिनिधी, टीव्ही 9, मराठी : प्रत्येक पक्षाच्या कट्ट्यावर आता राजकीय फराळ रंगला आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच आता शिवसेनेतूनही मिले सूर मेरा तुम्हारा असा सूर आळवला गेला आहे. राज्यात राजकीय फटाके फुटत असतानाच शिंदे सेनेच्या या नेत्याने मोठा बॉम्ब टाकला आहे. ठाकरे-शिंदे एकत्र आले तीच खरी दिवाळी, असे मोठे वक्तव्य शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे. या भावनिक वक्तव्याच्या फुलझडीने अनेक राजकीय फटाक्यांच्या वाती पेटल्या इतके मात्र नक्की.
शिवसेना दुभंगली हा दुर्देवी प्रसंग
माध्यमांशी बोलताना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेच्या फुटीवर मनातील भावना व्यक्त केल्या. ज्या दिवशी शिवसेना दुभंगली, तो अत्यंत दुर्दैवी प्रसंग होता. असा प्रसंग तर यायलाच नको होता, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. पक्षातील फुटीवर दोन्ही बाजूच्या नेत्यांच्या मनातील भावना वेळोवेळी समोर आल्या आहेत. शिवसेनेत फूट नको होती असे अनेकांना वाटते, तीच भावना आमदार रघुवंशी यांनही बोलून दाखवली.
ठाकरे-शिंदे एकत्र आले तीच खरी दिवाळी… या बड्या नेत्याचे मोठे सूचक वक्तव्य
दोन्ही शिवसेना एकत्र येणार का? यावर रघुवंशी यांनी मार्मिक भाष्य केले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनंतर आता दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची चर्चा यामुळे रंगली. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर तीच खरी दिवाळी असेल, असे मोठे वक्तव्य आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. दोन्ही शिवसेना एकत्र येणार की नाही, याबाबत रघुवंशींनी सूचक विधान केले. शिवसेना डुबकली गेली, त्याच दिवशी हा दुर्दैवी प्रसंग यायला नको होता. चंद्रकांत रघुवंशी यांच्या विधानानंतर दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आलेले आहे. कालपासून बैठकांचे, भेटीगाठीचे सत्र वाढले आहे. दोन्ही गटातील नेते हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीला येत असल्याने या चर्चा सुरू आहे. त्याचवेळी शिंदेंच्या आमदाराने शिवसेना एकत्रिकरणाविषयी साद घालणारे विधान केल्याने त्याची चर्चा होत आहे. उत्तर महाराष्ट्रात एरव्ही गुलाबराव पाटील यांची मुलूख मैदान तोफ धडाडत असते. पण गेल्या काही दिवसांपासून रघुवंशी हे सुद्धा त्यांच्या वक्तव्यांनी प्रकाशझोतात आलेले आहे.
