सोनिया गांधींनी कार्यकर्त्यांना वंदे मातरम म्हणण्यापासून रोखलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर काय?

काँग्रेस मुख्यालयात सोनिया गांधींनी वंदे मातरम पूर्ण म्हणण्यापासून रोखल्याच्या भाजपच्या आरोपावर काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसने हे आरोप खोटे ठरवले असून, वंदे मातरमचा ऐतिहासिक संदर्भ दिला. रवींद्रनाथ टागोर यांच्या सल्ल्यानुसार काँग्रेस नेहमीच गीताचा पहिला अंतरा गाते, असे स्पष्ट करत हा वाद निरर्थक असल्याचे म्हटले.

सोनिया गांधींनी कार्यकर्त्यांना वंदे मातरम म्हणण्यापासून रोखलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर काय?
sonia gandhi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 15, 2026 | 1:47 PM

स्वातंत्र्य दिनानिमित्ताने काँग्रेसच्या मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी वंदे मातरम पूर्ण म्हटलं गेलं. मात्र, त्यावरून वाद सुरू झाले आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी वंदे मातरम पूर्ण होऊ न देण्याचा प्रयत्न केला. तसेच वंदे मातरम पूर्ण म्हटल्या गेल्याने सोनिया गांधी यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर नाराजी व्यक्त केली असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया आली असून हा निखालस खोटा आरोप असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.

भाजपचे प्रवक्ते आर. पी. सिंह यांनी ट्विट करून हा आरोप केला आहे. जेव्हा वंदे मातरम गायलं जात होतं, त्यावेळी सोनिया गांधींनी कथितपणे आपली नाराजी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर त्यांनी कार्यकर्त्यांना मध्येच वंदे मातरम थांबवण्यास सांगितलं, असा आरोप करतानाच सोनिय गांधींना वंदे मातरमचा एवढा द्वेष का आहे? असा सवाल आर. पी. सिंह यांनी केला आहे.

भाजपच्या या आरोपावर काँग्रेसने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेस मुख्यालयात वंदे मातरम सुरू असताना कोणताही व्यत्यय आला नाही. भाजपकडून खोटे आरोप केले जात आहेत, असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं आहे. तर, वंदे मातरमवरून कोणताच वाद नाही, असं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

ऐतिहासिक संदर्भ काय?

यावेळी जयराम रमेश यांनी ऐतिहासिक संदर्भ देत काँग्रेस वंदे मातरमचा कसा सन्मान राखत आली आहे हे स्पष्ट केलं. वंदे मातरमसाठी ऑक्टोबर 1938 मध्ये काँग्रेस कार्यसमितीची बैठक झाली होती. या बैठकीला महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, मौलाना अबुल कलाम आजाद, चक्रवर्ती राजगोपालचारी आणि पंडीत जवाहरलाल नेहरू आदी उपस्थित होते. या बैठकीत रवींद्रनाथ टागोर यांच्या सल्ल्यानुसार काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात वंदे मातरम गायनाचा निर्णय घेण्यात आला. रवींद्रनाथ टागोर यांनीच या गीतातील पहिला अंतराच गायचा सल्ला दिला होता. त्यानुसार काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात आमचे कार्यकर्ते वंदे मातरम गातात. त्यामुळे यात कोणताही वाद नाही, असं जयराम रमेश यांनी म्हटलंय.

नेत्यांचा खुलासा

काँग्रेस नेते पवन खेडा यांनीही यावर खुलासा केला आहे. काँग्रेस मुख्यालयातील वंदे मातरम गातेवेळी कोणतंही व्यवधान आलं नाही, असं खेडा यांनी म्हटलंय. तर राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही वंदे मातरमवरून कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, भाजपचे नेते अमित मालवीय यांनी यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. वंदे मातरमचा सुरुवातीचा अंतरा गायल्यानंतर सोनिया गांधीने गीत रोखण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांच्या इशाऱ्यावरच हे करण्यात आलं आहे, असा आरोप मालवीय यांनी केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us