वेश्याव्यवसाय करण्यास विधवा महिलेने नकार देताच स्पा मालकाने ओलांडल्या मर्यादा, नेमकं घडलं तरी काय?
25 वर्षीय विधवा महिलेने वेश्याव्यवसाय करण्यास नकार दिल्यानंतर स्पा मालकाने असं काय केलं, ज्यामुळे उडाली सर्वत्र खळबळ... मालकाने ओलांडल्या सर्व मर्यादा... तेव्हा नेमकं घडलं तरी काय?

सध्या आपल्या आजू-बाजू अशा काही घटना घडत आहेत, ज्यामुळे विश्वास नक्की कोणावर ठेवायचा असा प्रश्न पडतो. आता देखील असंच काही घडलं आहे. 25 वर्षीय विधवा महिलेला नोकरीची गरज असल्यामुळे तिने स्पा मालकावर विश्वास ठेवला आणि कामासाठी सुरुवात केली, सुरुवातीचे काही दिवस सर्वकाही सुरळीत सुरु होतं. पण नंतर स्पामालकाचा खरा चेहरा समोर आला, त्यानंतर हे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचलं. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेश येथीस भदोही येथे घडली आहे. नोकरी आमिष देत, स्पा मालकाने विधवा महिलेवर वेश्याव्यवसाय करण्याचा दबाव टाकला. पण जेव्हा महिलेने नकार दिला, तेव्हा त्याने महिलेला मारहाण केली. घडलेल्या घटनेनंतर 25 वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
एक महिन्यापासून महिला स्पॉ सेंटरमध्ये करत आहे काम…
या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी शुक्रवारी आरोपी सुजीत कुमार यादव याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 351(3) (गुन्हेगारी धमकी), 352 (शांतता भंग करण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने अपमान करणे) आणि 115(2) (इच्छेने दुखापत करणे) अंतर्गत एफआयआर दाखल केला.
महिने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, महिलीची ओळख जौनपूर निवासी सुजीत कुमार यादव याच्यासोबत आजमगड येथे झाली होती… सुजित याने स्वतःला स्पा सेंटरचा मालक असल्याचं सांगितलं आणि महिलेला नोकरी देण्याचा आरोप केला. महिला नोकरीच्या शोधात होती. त्यामुळे ती देखील सुजीत याच्यासोबत भदोही याठिकाणी आली आणि गेल्या 1 महिन्यापासून स्पा सेंटरमध्ये काम करत होती.
नकार दिल्यानंतर मारहाण…
महिलेने दिलेल्या माहितीनुसार, सुजीत याने तिच्यावर देखील अन्य महिलांप्रमाणे देह व्यापार करण्याचा दबाव टाकण्यास सुरुवात केली, तिने नकार दिल्यानंतर त्याने महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, तिचे केस ओढले आणि तिला जमीनीवर फेकलं. एवढंच नाही तर, तिला बेदम मारहाण केली. शिवाय वेश्याव्यवसाय न केल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे, तर स्थानीक स्तरावर हे प्रकरण चर्चेत आहे.