SSC CHSL result | एसएससी सीएचएसएल टियर – 1 चा आज निकाल, कुठे पाहाल?

| Updated on: Jan 15, 2021 | 1:23 PM

स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात SSC आज CHSL भरती परीक्षा 2019 च्या टियर -1 चा निकाल आज जाहीर करणार आहे.

SSC CHSL result | एसएससी सीएचएसएल टियर - 1 चा आज निकाल, कुठे पाहाल?
SSC
Follow us on

मुंबई : स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात SSC आज CHSL भरती परीक्षा 2019 च्या टियर -1 चा निकाल आज जाहीर करणार आहे. ही परीक्षा दिलेले उमेदवार ssc.nic.in या वेबसाईटवर जाऊन आपला निकाल पाहू शकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच SSC ने एका निवेदनाद्वारे CHSL भरती परीक्षा 2019 च्या टियर -1 चा निकाल 15 जानेवारी 2021 रोजी जाहीर केला जाईल असं सांगितलं होतं. यापूर्वी आयोगानं CHSLची अॅन्सर की आणि परीक्षार्थींची रिस्पॉन्स शीटही जारी केली होती. (Results of Staff Selection Commission’s CHSL exam today)

CHSL भरती परीक्षा 2019 च्या टियर -1 परीक्षेचं आयोजन देशातील विविध शहरात 17 ते 19 मार्च 2020 तसंच 12 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर, 19 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर आणि 26 ऑक्टोबर 2020 ला केलं होतं. स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे संयुक्त इंटर स्तरीय परीक्षेत टियर – 1 ऑनलाईन परीक्षा, डिस्क्रिप्टिव्ह पेपर टियर – 2 आणि स्किल आणि टायपिंग टेस्ट टियर -3 घेतली जाते.

किती पदांसाठी झाली होती परीक्षा?

स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात SSC ने CSHL मध्ये यावेळी 4 हजार 893 पदांची भरती जाहीर केली होती. CHSL 2019 मध्ये लोअर डिव्हिजन क्लार्क / ज्युनिअर सेक्रेटेरियल असिस्टंट / ज्युनिअर पासपोर्ट सहाय्यक पदाच्या 1 हजार 269 जागा, पोस्टल/शार्टिंग असिस्टंटच्या 3 हजार 598 जागा, डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या 26 जागांसाठी भरती जाहीर केली होती. हे रिक्त पद मंत्रालय आणि विभागांचे आहेत. या 4 हजार 893 पदांपैकी 2 हजार 354 पद आरक्षित आहेत. त्यात 630 पदं एससी प्रवर्गासाठी, 386 पदं एसटी, तर 1 हजार 14 पदं ओबीसी आणि 509 पदं ही EWS प्रवर्गासाठी राखीव होत्या. स्टाफ सिलेक्शन कमिशनने संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (10+2) परीक्षा 2019 साठी डिसेंबर महिन्यात नोटिफिकेशन जारी केलं होतं.

संबंधित बातम्या:

रविवार विशेष : नव्या वर्षात 32 हजार नव्या नोकऱ्यांची नांदी; 10 वी पासपासून PG पर्यंत शिकलेल्यांना सुवर्णसंधी

डॉक्टर-इंजिनिअरपेक्षाही तगडा पगार, कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सुलभाला 46.27 लाखांचं पॅकेज

Results of Staff Selection Commission’s CHSL exam today