श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी मंदिरात चेंगराचेंगरी; 7 भक्तांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

श्रावणातील तिसऱ्या सोमवारी अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत 7 शिवभक्तांचा मृत्यू झाला आहे.

श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी मंदिरात चेंगराचेंगरी; 7 भक्तांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती
temple stampede
| Updated on: Aug 17, 2026 | 9:51 AM

बिहारच्या लखीसरायमध्ये श्रावण महिन्याच्या तिसऱ्याच सोमवारी भीषण दुर्घटना घडली आहे. मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सात भक्तांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लखीसरायचे जिल्हाधिकारी शैलेंद्र कुमार यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. मंदिरातील चेंगराचेंगरीत भक्तांच्या मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

विजेचा खांब पडल्यानंतर शॉक बसत असल्याची अफवा भक्तांमध्ये पसरली. त्यानंतर भक्तांनी एकच धावाधाव केली. त्यात दुर्दैवाने काही भक्तांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिलांचा समावेश अधिक आहे. या घटनेतील जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 6 वाजता ही दुर्घटना घडल्याचे सांगितले. चेंगराचेंगरी झाल्यानंतर भक्त मंदिरात धावू लागले. लोकांनी मंदिरातील बॅरिकेट्स पाडून धावाधाव सुरू केली. यावेळी काही भक्त एकमेकांच्या अंगावर पडले. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मंदिरात एकच आरडाओरड सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले. प्रशासनासह स्थानिकांनी भक्तांच्या मदतीसाठी बचाव कार्य सुरू केलं आहे.

मृतांची नावे आली समोर

मनमाला देवी, वय – 44
रिंकू देवी, वय – 50
हेमलता देवी, वय – 55
ललिता देवी – वय – 45
सोनी देवी – वय -50
संगिता देवी, वय 40

 

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, बॅरिकेट्सजवळील विजेचा खांब कोसळला. त्यानंतर विजेचा खांब कोसळल्यानंतर शोक लागत असल्याची अफवा पसरली. त्यामुळे अनेक जण जीव वाचवण्यासाठी धावू लागले. भक्त एकमेकांच्या अंगावर उडी मारून पळू लागले. या धावपळीत काही जण गंभीर जखमी झाले. या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आह.  अशोकधाम मंदिरातील घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात आलं आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मदिरांतील जखमींवर जवळील आरोग्य शिबीरात उपचार सुरू करण्यात आले आहेत. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे. काही जखमींना पुढील उपचारासाठी इतरत्र हलवण्यात आलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us