
भारतीय वायु सेनेने (IAF) गुरुवारी जगासमोर रशियाकडून घेतलेल्या S-400 एअर डिफेन्स मिसाईल सिस्टमचा व्हिडीओ जारी केला आहे. भारतीय सैन्याच्या इतिहासातील ही सर्वात मोठा एअर किल म्हटली जात आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला महागात पडलेल्या S-400 एअर डिफेन्स मिसाईल सिस्टमचा हा व्हिडीओ पाहून पाकिस्तानच्या हृद्यात धडकी भरली आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूरची यामुळे आठवण काढली जात आहे.
हा व्हिडीओ थेट गेल्या वर्षी मे महिन्यात पाकस्तानच्या विरोधात झालेल्या ऑपरेशन सिंदूरची आठवण देत आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये S-400 ने मोठी महत्वाची भूमिका बजावली होती. आणि पाकिस्तानची एअर फोर्सचे एका विमानाला सुमारे ३०० किलोमीटर आत पाकिस्तानच्या भागात जाऊन पाडले होते.
व्हिडिओतर IAF ने एक पॉवरफूल मॅसेज दिलेला आहे. ‘दुश्मन पहुंच से बाहर हो सकता है, लेकिन नजरों से कभी नहीं’ ( शत्रू आवक्याच्या बाहेर असू शकतो. परंतू नजरेपासून केव्हाच नाही ) असे या व्हिडीओत कॅप्शन दिली आहे. या व्हिडीओ फुटेजमध्ये रडावर येताच शत्रूच्या जेटला डिटेक्ट करणे आणि नंतर एअर डिफेन्स सिस्टीमला एक्टीव्हेट करण्याचा सीन दाखवला आहे.
मात्र, हा जारी केलेला मिसाईल फायरिंगचा व्हिडीओ ‘ऑपरेशन सिंदू’ चा नाही. या प्रमोशलन व्हिडीओ आहे. जो उद्या २७ फेब्रुवारी रोजी राजस्थानात होऊ घातलेल्या वायू शक्ती कसरतीसाठी तयार केलेला आहे. तरीही यात ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा उल्लेख स्पष्टपणे केलेला आहे.
गेल्यावर्षी ऑक्टोबरात IAF चीफ एअर चीफ मार्शल ए.पी. सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरचे डिटेल्स शेअर केले होते. त्यांनी सांगितले की या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्य दलाने किमान डझनभर पाकिस्तानी विमानांना नष्ट वा क्षतिग्रस्त केले होते.
IAF चीफने खास करुन एक दीर्घ अंतराच्या टार्गेटचा उल्लेख केला. आमच्या जवळ सुमारे ३०० किलोमीटर अंतरापर्यंतची क्लिअर एव्हीडन्स आहे. हे पाक एअर फोर्सच्या सिग्नल इंटेलिजन्स प्लेन होते. सोबत F-16 आणि J-17 क्लासच्या पाच हाय टेक फायटर्स देखील आमच्या सिस्टीमने टार्गेट केले. हे सर्व काही नव्यानेच सामी झालेल्या लांबपल्ल्याच्या सरफेस -टू-एअर मिसाईल सिस्टीम S-400 मुळे शक्य झाले.
येथे पाहा व्हिडीओ –
Indian Air Force: Infallible, Impervious and Precise
1 day to go.
The Indian Air Force has successfully validated all operational parameters during the Full Dress Rehearsal for #Vayushakti26 at Pokhran, all targets effectively neutralised.
All Air Warriors now stand fully… pic.twitter.com/j7ZWmOYYb1
— Indian Air Force (@IAF_MCC) February 26, 2026