CJI Suryakant : सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सुर्यकांत यांचं कॉक्रोच टिप्पणीवर पहिल्यांदा स्पष्टीकरण, ‘भ्रमित करण्याचा क्रूर प्रयत्न’

CJI Suryakant : "जेव्हा आम्ही अधिकारांबद्दल बोलतो, तेव्हा आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची क्षमता सुद्धा ठेवली पाहिजे. समाजात सद्भाव टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पारदर्शकतेचा वापर व्यावसायिक फायद्यासाठी करु नये. आम्ही न्यायपालिकेत पारदर्शकता आणण्यासाठी कटिबद्ध आहोत" असं चीफ जस्टिस सूर्यकांत म्हणाले.

CJI Suryakant : सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सुर्यकांत यांचं कॉक्रोच टिप्पणीवर पहिल्यांदा स्पष्टीकरण, भ्रमित करण्याचा क्रूर प्रयत्न
CJI Suryakant
| Updated on: Aug 15, 2026 | 8:00 AM

सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश सुर्यकांत यांच्या कॉक्रोच टीपण्णीवरुन देशात कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म झाला. CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सरन्यायाधीशांच्या टिप्पणीवरुन इन्स्टाग्रामवर कॉक्रोच अकाऊंट काढलं. त्याला तरुणाईकडून तुफान प्रतिसाद मिळाला. त्यातून कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना झाली. या कॉक्रोच टिपण्णीवर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सुर्यकांत यांनी पाहिल्यांदा स्पष्टीकरण दिलं आहे. डीडी न्यूजच्या मुलाखातीत ते यावर बोलले आहेत.
“मी केलेल्या टीपण्णीचा दुरूपयोग करण्यात आला. मी जे बोललो नाही ते सांगितल गेलं, की मी बोललो आहे. माझ्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीनं दाखवत देशातील तरूणांना भ्रमित करण्याचा क्रूर प्रयत्न करण्यात आला” असं सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले.

“हे अत्यंत दुर्देवी असल्याचं सरन्यायाधीश सुर्यकांत यांनी आपल्या मुलाखातीत सांगितलं. माझ्या वक्तव्याला मिसकोट काही लोकांनी केलं, चुकींच्या पद्धतीनं त्याचा उपयोग केला. जे लोक असं करतात मला सांगायचं आहे ते समाजाचे अभिन्न अंग आहेत. तुम्ही मीडीयात , सोशल मिडीयात , प्रिंट मिडीयात आहात किंवा तुम्ही नागरिक असाल. आपल्यावर कायदेशीर, सामाजिक आणि संविधानिक जबाबदारी आहे” असं सुर्यकांत म्हणाले.

तेव्हा आपण जबाबदा-यावर बोललं पाहिजे

“जेव्हा आम्ही अधिकाराबद्दल बोलतो तेव्हा आपण जबाबदा-यावर बोललं पाहिजे. सगळ्यांनी आपली जबाबदारी लक्षात ठेवली पाहिजे. समाजात एकी राहीलं असा प्रयत्न आपण केला पाहिजे” असं सुर्यकांत बोलले.

जसं की मी बोललो आहे

DD News वर बोलताना सुर्यकांत म्हणाले की, “न्यायिक कार्यवाहीच्या क्लिप्स योग्य संदर्भाशिवाय ऑनलाइन शेअर केल्या जात आहेत. माझी टिप्पणी चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आली. त्याचा चुकीचा वापर करण्यात आला. जे मी बोललोच नाही, ते दाखवण्यात आलं, जसं की मी बोललो आहे. हे खूप दुर्देवी आहे. देशातील युवकांची दिशा भरकटण्याचा हा चुकीचा प्रयत्न आहे”

हा वाद कधीचा

15 मे रोजीचा हा वाद आहे. त्यावेळी सरन्यायाधीश सुर्यकांत यांनी एका प्रकरणाच्या सुनावणीत बनावट डिग्री बाळगणाऱ्या काहीजणांची कॉकरोच सोबत तुलना केली होती. त्याच्या या टिप्पणीवरुन युवकांच्या मनात रोष निर्माण झाला आणि कॉकरोच जनता पार्टीच्या अभियानाची सुरुवात झाली. हे दुर्भाग्यपूर्ण असल्याचं जस्टिस सूर्यकांत म्हणाले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us