
Swami Avimukteshwaranand: स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्यावर अल्पवयीन शिष्यांचं लैंगिक शोषण केल्याचं गंभीर आरेप आहेत. समोर आलेल्या दोन शिष्यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद, मुकंदनंद प्रकाश उपाध्याय यांच्यासोबत अन्य लोकांवर देखील गंभीर आरोप केले आहे. शिष्यांचा दावा आहे की, ‘गुरू दीक्षा म्हणून अत्याचार केले जात होते आणि त्यांच्यासोबत आक्षेपार्ह कृत्ये करण्यात आली.’, एवढंच नाही तर, त्यांनी असे देखील आरोप केले आहेत की, बिहार आणि राजस्थान येथून मुलांना आणलं जायचं… जवळवपास 20 शिष्य तर असेच होते… त्यांच्या मते, असे सुमारे 20 इतर शिष्य आहेत जे कथितपणे छळाचे बळी ठरले होते, परंतु ते पुढे येण्यास घाबरतात आणि अडकले आहेत.
काही कथित आरोपींची नावे घेत शिष्य म्हणाले, ‘मठ परिसरात अन्य बाहेरचे लोक देखील येत होते… ज्यामध्ये प्रभावशाली आणि पांढरपेशा व्यक्तींचा समावेश असल्याचा आरोप आहे. जरी त्यांनी सार्वजनिकरित्या त्यापैकी कोणाचेही नाव घेतले नाही, तरी त्यांनी त्यांची ओळख पटवल्याचा दावा केला. आहे. आम्ही कोणत्या गोष्टीसाठी नकार दिल्यानंतर आम्हाला गप्प राहण्याची धमकी दिली जायची… मठात एक स्वीमिंगपूल देखील आहे, जेथे काही सखी अंघोळ देखील करतात…’
एवढंच नाही तर, अन्य शिष्यांनी मठातून पळण्याचा देखील प्रयत्न केला. म्हणाले, ‘आम्ही मठातून निघालो आणि दुसऱ्या धार्मिक नेत्याकडे पोहोचलो आणि त्यांना सर्वकाही सांगितलं… पण आम्हाला धमक्या देण्यात आल्या आणि अद्यापही काही मुलं तिकडे अडकलेली आहेत.’, सध्या याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.
मठात स्वीमिंग पूल असल्याचा दावा मठात राहिलेल्या एका लेखीकेने केला आहे. यावर स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मठात असलेले स्वीमिंगपूल आमच्या गुरुजींचं होतं, ते आमच्या गुरुजींसाठी खास बनवण्यात आलं होतं… त्यांच्या आरोग्यासाठी ते स्वीमिंगपूल बांधण्यात आलं होतं मठात कोणतंच, गुप्त स्थान, शीश महल किंवा स्विमिंग पूल नाही. जेव्हा आमचे गुरुजी मठात राहत होते, तेव्हा डॉक्टरांनी त्यांच्या व्यायाम करण्यासाठी एक व्यवस्था तयार करण्यात आली होती. आता ते स्वीमिंग पूल बंद आहे.’ असं देखील शंकराचार्य म्हणाले.