दोन अडीच हजार रुपये घेणं हा भ्रष्टाचार म्हणता येणार नाही, भाजप मंत्र्यांचं वादग्रस्त विधान, लाचखोरींच्या तक्रारीनंतर म्हणाल्या काय?

BJP Minister on Bribery: पंतप्रधान घरकुल योजनेत (PM Awas Yojana) लाभार्थ्यांकडे दोन ते अडीच हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार केल्यावर भाजप मंत्र्यांनं अजब दावा केला. त्यावरून देशभरात टीका होत आहे.

दोन अडीच हजार रुपये घेणं हा भ्रष्टाचार म्हणता येणार नाही, भाजप मंत्र्यांचं वादग्रस्त विधान, लाचखोरींच्या तक्रारीनंतर म्हणाल्या काय?
दोन अडीच हजार रुपये घेणं हा भ्रष्टाचार नाही, भाजप मंत्र्यांचं वादग्रस्त विधान
| Updated on: Nov 28, 2026 | 9:52 AM

BJP Minister on Bribery: उत्तर प्रदेशच्या महिला आणि बालविकास खात्याच्या कॅबिनेट मंत्री बेबी राणी मोर्या यांच्या एका विधानाने मोठी खळबळ उडवून दिली आहे. पंतप्रधान घरकुल योजनेत (PM Awas Yojana) लाभार्थ्यांकडे दोन ते अडीच हजार रूपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीवर त्यांनी अजब प्रतिक्रिया दिली आहे. या वक्तव्यामुळे देशात वादंग निर्माण झाले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर मोठी टीका होत आहे.

काय होती तक्रार?

Loading...

बेबी राणी मोर्य शुक्रवारी हाथरस शहरातील रमनपूर भागात एका कार्यक्रमाला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात याच भागातील एका महिलेने त्यांच्याकडे कैफियत मांडली. मंत्र्यांनी या परिसरातील महिलांची भेट घेतली. त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. त्याच दरम्यान, उपस्थित महिलांना पीएम आवास योजनेचा लाभ देण्याच्या नावाखाली पैशांची मागणी केली जात असल्याची तक्रार त्यांच्यासमोर मांडली. तसेच या परिसरातील महिलांना घरकुलं मिळवून देण्याची मागणीही केली आहे. त्यावेळी घरकुल योजनेतील भ्रष्टाचारावर त्यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे.

थेट भ्रष्टाचार म्हणता येणार नाही

यावेळी एका महिलेने त्यांच्याकडे घरकुल योजनेत पैसे उकळले जात असल्याची तक्रार केली. त्यावर कॅबिनेट मंत्री बेबी राणी मौर्या यांनी अजबच उत्तर दिले. दोन ते अडीच हजार रुपये घेणे हा भ्रष्टाचार होत नाही. कदाचित कोणी कागदपत्रे बनवून देण्यासाठी हे पैसे घेतले असतील. केवळ पैसे घेतल्याची बाब समोर आल्याने त्याला थेट भ्रष्टाचार म्हणता येणार नाही. तर पैसे नेमके कोणत्या कामासाठी घेतले गेले, हे आधी तपासावे लागेल, असे त्यांनी नमूद केले.

नंतर दिले कारवाईचे आश्वासन

पण महिलेने तिची बाजू रेटल्यानंतर जर कोणी खरोखरच लाच घेतली असेल , तर अशा व्यक्तींवर निश्चितच कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन कॅबिनेट मंत्र्यांने दिले. याप्रकरणी आमदाराच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्या आधारे तपास सुरू केला आहे. तसेच तक्रारदार महिलांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल, असेही मंत्र्यांनी सांगितले. पीएम आवास योजनेतील कथित वसुलीच्या तक्रारी आणि बेबी राणी मौर्य यांच्या विधानाची देशभरात चर्चा होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us