तमिळनाडूच्या बहुमत चाचणीत विजय यांच्या सरकारला मोठं यश; पहिली प्रतिक्रिया समोर
Tamil Nadu Assembly Floor Test : मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी तमिळनाडू विधानसभेच्या बहुमत चाचणीत यश मिळवलं आहे. या बहुमत चाचणीत त्यांच्या सरकारला मोठा पाठिंबा मिळाला आहे. विजय यांच्या सरकारने बहुमताचा जादुई आकडा सहज पार करून सभागृहात आपली ताकद सिद्ध केली आहे.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी आज (बुधवारी) विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. एकूण 144 आमदारांनी टीव्हीकेच्या बाजूने मतदान केलं, तर 22 जणांनी विरोधात मतदान केलं आहे आणि पाच जण तटस्थ राहिले. विजय यांनी स्थापन केलेल्या नव्या सरकारची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी हा विश्वासदर्शक ठराव घेण्यात आला. 171 सदस्यीय विधानसभेत विजय यांनी सहजपणे स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. विश्वासदर्शक ठरावादरम्यान काँग्रे, सीपीआय (एम), व्हीसीके आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययुएमएल) यांनी विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा दिला. काँग्रेसने आपल्या पाच आमदारांसह सरकारला पाठिंबा दिला, तर सीबीआय (एम), व्हीसीके आणि आययूएमएलने प्रत्येकी दोन आमदारांसह बहुमत चाचणीत योगदान दिलं. अम्मा मक्कल मुन्नेत्र कझगमचे (एएमएमके) आमदार एस. कामराज यांनीही सरकारच्या बाजूने मतदान केलं. त्यामुळे आघाडीचं संख्याबळ 121 वर पोहोचलं.
बहुमत चाचणीतील या यशानंतर मुख्यमंत्री विजय यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘हे अल्पसंख्याकांचं सरकार आहे. अल्पसंख्याकांसाठी काम करणारं हे सरकार आहे’, अशी प्रतिक्रिया विजय यांनी दिली. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुरू असलेल्या तीव्र राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर हा निकाल विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारला मोठं बळ देणारा ठरला आहे.
बातमी अपडेट होत आहे..