अमोनिया वायू गळतीने हाहाकार, कारखान्यात 7 जणांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर

या वायूगळतीत सात लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 10 पेक्षा अधिक लोकांची प्रकृती गंभीर आहे. वायूगळतीमुळे प्रकृतीत बिघाड झालेल्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

अमोनिया वायू गळतीने हाहाकार, कारखान्यात 7 जणांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर
tamil nadu gas leakage
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 21, 2026 | 6:33 PM

Tamil Nadu Ammonia Gas Leakage : तामिळनाडू राज्यातील तिरुवल्लूर जिल्ह्यातील पेरिपालयम येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका कारखान्यात अमोनिया वायूची गळती झाल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या वायूगळतीत सात लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 10 पेक्षा अधिक लोकांची प्रकृती गंभीर आहे. वायूगळतीमुळे प्रकृतीत बिघाड झालेल्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

अचानक वायू गळतीमुळे खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार तिरुवल्लूर जिल्ह्यात पेरिपालयम येथे कोळंबीवर प्रक्रिया करणारा कारखाना आहे. या कारखान्यात अनेक मजूर काम करतात. आज (21 जून) कामगार रोजच्या प्रमाणे तिथे काम करत होते. परंतु त्या कारखान्यात अचानक अमोनिया गॅसची गळती सुरू झाली. गॅस गळतीमुळे अनेक कामगारांना श्वास घेणे कठीण होऊन बसले. काही वेळानंतर काही कामगारांची प्रकृती खालावली. ही घटना समोर येताच कंपनीत खळबळ उडाली.

7 जणांचा मृत्यू, 10 जणांची प्रकृती गंभीर

अमोनिया वायूची गळती झाल्याने त्या कारखान्यात काम करणारे साधारण 45 पेक्षा जास्त कामगार बेशुद्द झाले. त्या सर्व कामगारांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार बेशुद्ध झालेल्या काही कामगारांच्या नाक आणि तोंडातून रक्तस्त्राव होत होता. बेशुद्ध झालेल्या एकूण 45 कामगारांपैकी 7 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर दहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे.

राज्यपालांनी व्यक्त केल्या संवेदना

दरम्यान ही घटना समोर येताच युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात आले. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी दु:ख व्यक्त केले. तिरुवल्लूर जिल्ह्यातील पेरियापलायम येतील एका गावात घडलेल्या वायूगळतीची दुखद घटना घडली. या घटनेमुळे मला दु:ख झाले आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. तसेच या कठीण काळात मृतांच्या कुटुंबीयांना शक्ती मिळो, अशी प्रार्थना व्यक्त करतो. ज्या लोकांवर उपचार सुरू आहेत, त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. वायूगळती नेमकी कशी झाली, याचा शोध घेतला जात आहे. मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.

Follow Us