तामिळनाडुत BJP-AIADMK युतीची घोषणा, अमित शाह म्हणाले NDA ला मजबूती मिळणार
तामिळनाडुत भाजप-एआयएडीएमके युतीची घोषणा करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजकीय पक्षाकडून कोणतीही मागणी नाही. दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढविणार आहोत. एनडीएसाठी हे फायद्याचे आहे. एआयएडीएमकेच्या अंतर्गत बाबतीत आमचा कोणताही इंटरफेअरेंस नसल्याचेही अमित शाह यांनी म्हटले आहे.

तामिळनाडुच्या राजकारणात मोठी फेरबदल होताना दिसत आहे. भारतीय जनता पार्टीचे ( बीजेपी ) प्रदेश अध्यक्ष के. अन्नामलाई यांना पदावर हटवल्यानंतर राज्यातील प्रमुख प्रादेशिक पक्ष ( AIADMK ) अण्णाद्रमुकने एनडीए येण्याचे घोषीतही केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूका राज्यात ई. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील, तर राष्ट्रीय स्तरावर या महायुतीचा चेहरा पंतप्रधान नरेंद्र मोदी राहतील.
अमित शाह म्हणाले की सन १९९८ पासून आम्ही जयललिताजी आणि अटलजी यांच्या काळापासून एकत्र निवडणूका लढवत आलो आहोत. एकदा तर आम्ही एकत्र ३९ पैकी ३० लोकसभेच्या जागा मिळून जिंकलो होतो. शाह म्हणाले की भाजपा आणि एआयएडीएमकेचे युती राजकीय नाही, तर विश्वास आणि विचारधारेवर आधारित आहे. शाह यांनी माजी मुख्यमंत्री जयललिता आणि नरेंद्र मोदी यांच्यातील ऋृणानुबंधाचाही उल्लेख केला आणि म्हणाले की दोन्ही नेत्यांनी एकमेकांसोबत मिळून नेहमीच तामिळनाडूच्या विकासासाठी काम केले आहे.
एआयएडीएमके यांच्या अंतर्गत प्रकरणात भाजपाचा हस्तक्षेप नसणार –
भाजपा निवडणूकीनंतर सरकारमध्ये सामील व्हायचे के नाही याचा निर्णय घेणार. एआयएडीएमके यांनी कोणतीही मागणी केलेली नाही आणि त्यांच्या अंतर्गत बाबीत भाजपाचा कोणताही हस्तक्षेप नसणार आहे. ही महायुती दोन्ही पक्षांसाठी उपयोगी आहे. आणि आम्ही एकत्र निवडणूक लढवू. मंत्र्यांची संख्या आणि जागांच्या वाटपाचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. सध्या एनडीएचे मुख्य लक्ष्य राज्यातील भ्रष्ट डीएमके सरकार हटवण्याचे आहे असे अमित शाह म्हणाले.




डीएमकेचा मुख्य मुद्यांवर लक्ष हटविण्याचा प्रयत्न
सनातन धर्म आणि भाषा सारख्या मुद्यांवर डीएमके जाणूनबुजुन वाद घालत आहे., म्हणजे मुख्य मुद्यांवरुन लोकांचे लक्ष्य उडावे. तामिळनाडूच्या प्रचारात मोठा मुद्दा भ्रष्टाचार असणार आहे आणि जनता यावेळी विकास आणि पारदर्शकतेला मतदान करेल.अटल बिहारी वाजपेयी आणि जयललिता यांच्या काळापासून सुरु असलेल्या या महायुतीची आठवण काढत अमित शाह म्हणाले की भाजपा आणि एआयएडीएमके यांनी एकत्र मिळून याआधीही मोठे यश मिळविले आहे. यावेळी जनता एनडीएच्या बाजूने मते देईल असे अमित शाह यावेळी म्हणाले.
तामिळनाडुची जनता कधी माफ नाही करणार
मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांच्या सरकारने आतापर्यंत ३९,००० कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. ज्यात मद्यघोटाळा आणि मनरेगा घोटाळा मुख्य आहे. आम्ही डीएमके सरकारच्या घोटाळ्यांना चव्हाट्यावर आणणार आहोत. तामिळनाडूची जनता स्टॅलीन आणि उदयनिधी यांना या भ्रष्टाचाराला बद्दल कधीच माफ करणार नाही असे अमिश शाह यांनी म्हटले आहे.