थलापती विजय यांनी लोकांना फसवलं? लाखो पोरांना सोन्याची अंगठी मिळणार का? त्या योजनेचं काय झालं?

ही योजना लांबवणीवर पडणार असल्याने तिच्यात काही बदल केले जाणार का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. परंतु या योजनेत कोणतेही बदल होणार नाहीत, थलापती विजय यांनी केलेल्या घोषणेनुसारच या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे सांगण्यात आले आहे.

थलापती विजय यांनी लोकांना फसवलं? लाखो पोरांना सोन्याची अंगठी मिळणार का? त्या योजनेचं काय झालं?
thalapathy vijay
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 09, 2026 | 6:54 PM

Thalapathy Vijay : तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलापती विजय हे नेहमीच चर्चेत असतात. थलापती विजय हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयांचीही तेवढीच चर्चा होते. दरम्यान, आता त्यांनी केलेल्या एका घोषणेची देशभरात चर्चा होत आहे. त्यांनी शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला सोन्याची अंगठी देण्यात येईल, असं जाहीर केलं होतं. परंतु आता या घोषणेची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही. म्हणूनच थलापती विजय दिलेलं आश्वासन पूर्ण करणार नाहीत? असा दावा केला जातोय.

प्रत्येक बालकाला एक ग्रॅम सोन्याची अंगठी

थलापती विजय यांनी येत्या 15 सप्टेंबरपासून शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या नवजात बालकाला एक ग्रॅम वजानाची सोन्याची अंगठी देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. शासकीय रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहन मिळावे तसेच शासकीय रुग्णालयांच्या दर्जात सुधारणा व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता थलापती विजय यांची हीच योजना आता लांबवणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. 22 जून 2026 रोजीपासून जन्मलेल्या बालकांना ही सोन्याची अंगठी दिली जाणार आहे.

योजनेच्या अंमलबजावणीला विलंब होतोय?

या योजनेचे नाव थाइमामन थंगा मोथिरम थिट्टम’ असे आहे. मामाकडून भाच्याला दिली जाणारी सोन्याची अंगठी असा या योजनेच्या नावाचा अर्थ आहे. या योजनेची अंमलबजावणीची 15 सप्टेंबरपासून होणार होती. परंतु विजय यांचे विश्वासू तसेच तामिळनाडूचे आरोग्यमंत्री के. जी अरुणराज यांनी हा योजनेच्या अंमलबजावणीस उशीर होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. या काळात थलापती विजय हे परदेशात असतील. ते परदेशात असल्याने या योजनेची सुरुवात थोडी उशिराने होईल. राज्यातील गुंतवणुकीसाठी विजय यांचा हा परदेश दौरा खूप महत्त्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

योजनेच्या अटीत काही बदल होणार का?

दरम्यान, ही योजना लांबवणीवर पडणार असल्याने तिच्यात काही बदल केले जाणार का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. परंतु या योजनेत कोणतेही बदल होणार नाहीत, थलापती विजय यांनी केलेल्या घोषणेनुसारच या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us