AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आठव्या वेतन आयोगात 40 वर्षे जुना नियम बदलणार! केंद्रीय कर्मचाऱ्यांना नेमका काय फायदा होणार?

आठव्या वेतन आयोगाच्या हालचाली वेगाने सुरू आहेत. पण हा वेतन कधी लागू होणार? याबाबत उत्सुकता आहे. असं असताना निवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यासाठी 40 वर्षे जुना नियम बदलण्याची मागणी केली आहे.

आठव्या वेतन आयोगात 40 वर्षे जुना नियम बदलणार! केंद्रीय कर्मचाऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
आठव्या वेतन आयोगात 40 वर्षे जुना नियम बदलणार! केंद्रीय कर्मचाऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
| Updated on: Sep 09, 2026 | 7:00 PM
Share

आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा गेल्या दिवसांपासून सुरू आहेत. कर्मचारी संघटनांनी अनेक मागण्या वेतन आयोगापुढे ठेवल्या आहे. यात एक मागणी निवृत्ती कर्मचाऱ्यांची देखील आहे. जर निवृत्त कर्मचाऱ्यांची ही मागणी मान्य केली तर 40 वर्षे जुना नियम बदलावा लागणार आहे. निवृत्त होताना सरकारी कर्मचारी आपल्या भविष्यातील पेन्शनचा एक मोठा भाग एकरकमी ॲडव्हान्स म्हणून उचलू शकतात. याला ‘कम्युटेशन’ असं म्हंटलं जातं. ही एकरकमी घेतलेली रक्कम वसूल करण्यासाठी सध्याच्या नियमानुसार पुढील 15 वर्षे त्या कर्मचाऱ्याच्या दरमहा पेन्शनमधून कपात केली जाते. हा अवधी पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा पूर्ण पेन्शन मिळणे सुरू होते. हा नियम 1986 पासून म्हणजे जवळपास 40 वर्षांपासून हा नियम सुरू आहे. यात आता बदल करण्याची मागणी होत आहे. हा अवधी 15 वर्षांऐवजी 10 ते 12 वर्षांवर आणण्यात यावा, अशी मागणी संघटनांनी केली आहे.

संघटनांचं म्हणणं आहे तरी काय?

कर्मचारी आणि निवृत्तीनंतर पेन्शन घेणाऱ्या संघटनांच्या मते, हा नियम लागू केला तेव्हा आर्थिक आणि डेमोग्राफिक स्थिती वेगळी होती. यात आता फार बदल झाला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. नॅशनल काउंसिल ऑफ द जॉइंट कंसल्टेटिव मिशनरी, ऑल इंडिया डिफेंस इम्प्लॉइज फेडरेशन आणि फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गेनाइजेशनने हा अवधी 11 वर्षांची करण्याची मागणी केली आहे. तर इंडियन रेल्वेज टेक्निकल सुपरवायजर्स असोसिएशनने हा अवधी 12 वर्षांचा करण्याचा प्रस्ताव दिला आहे. ऑल इंडिया न्यू पेन्शन स्कीम इम्प्लॉइज फेडरेशनने हा अवधी 10 वर्षांचा करण्याची मागणी केली आहे. भारत पेन्शनर्स समाज आणि ऑल पेन्शर्स असोसिएशनने हा अवधी 11 वर्षांचा करण्याची मागणी केली आहे.

100 रुपयांच्या कम्युटेड पेन्शनचं उदाहरण

नॅशनल काउंसिल ऑफ द जॉइंट मशिनरीने 100 रुपयांच्या कम्युटेड पेन्शनचं उदाहरण दिलं आहे. 61 वर्षीय निवृत्ती वेतन धारकासाठी, मासिक पेन्शनच्या प्रत्येक 100 रुपयाचे 8.194 कम्युटेशन फॅक्टरवर गणना केली तर अंदाजे 9833 एकरकमी रक्कम मिळते. यानंतर निवृत्तीवेतनधारकाच्या मासिक निवृत्ती वेतनातून 100 रुपये कापले जातात. ही रक्कम 10 वर्षात वसूल केली तर 12000 आणि 15 वर्षात वसू केली तर 18000 इतकी होते. खरं तर एकरकमी रक्कम अंदाजे 10 वर्षात वसूल होते. त्यामुळे त्यानंतरच्या कपातीचा आढावा घेण्याची मागणी केली आहे.

Follow Us
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा
दहीहंडी उत्सवात नियमभंग; पुणे नागपुरात 28 जणांवर गुन्हे दाखल
दहीहंडी उत्सवात नियमभंग; पुणे नागपुरात 28 जणांवर गुन्हे दाखल
भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या...
भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... अमित शहा...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... शहांचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप,
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप, व्हिडीओ व्हायरल
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर...
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर घात केला अन्...
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरे..
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरेंनी थेट...
3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! सामंत, लाडांनी आकडेवारीच सांगितली
Maratha Reservation | मराठवाड्यात 3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! उदय सामंत-प्रसाद लाडांनी आकडेवारीच सांगितली
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली;12 तारखेला अंतरवालीत होणार...
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली; 12 तारखेला अंतरवालीत होणार बैठक