AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

51 वर्षांपूर्वीचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट, ज्यामधील सर्वच गाणी ठरली सुपरहिट, आजही वेळ काढून बघतात लोक

51 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाने हिंदी सिनेमाच्या इतिहासात वेगळे स्थान निर्माण केले. दमदार कथा, लक्षात राहणारे संवाद, जबरदस्त अभिनय आणि लोकप्रिय गाण्यांमुळे हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. मैत्रीपासून प्रेमापर्यंत जीवनातील अनेक रंग या 6 गाण्यांत पाहायला मिळाले.

51 वर्षांपूर्वीचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट, ज्यामधील सर्वच गाणी ठरली सुपरहिट, आजही वेळ काढून बघतात लोक
Shole MovieImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Sep 09, 2026 | 6:59 PM
Share

51 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाने हिंदी सिनेमाच्या इतिहासात वेगळे स्थान निर्माण केले. दमदार कथा, लक्षात राहणारे संवाद, जबरदस्त अभिनय आणि लोकप्रिय गाण्यांमुळे हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. मैत्रीपासून प्रेमापर्यंत जीवनातील अनेक रंग या 6 गाण्यांत पाहायला मिळाले.

हा चित्रपट दुसरा तिसरा कोणता नाही तर सुप्रसिद्ध ‘शोले’ चित्रपट आहे.  या चित्रपटातील गाजलेले संवाद तर आजही लोकं मनापासून ऐकतात. या पैकी सर्वात चर्चेतील एक म्हणजे,  ‘कितने आदमी थे’, ‘तुम्हारा नाम क्या है बसंती’, ‘हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं’ आणि ‘ये हाथ हमको दे दे ठाकुर’ यांसारखे संवाद आजही लोकप्रिय आहेत. जय, वीरू, ठाकुर आणि गब्बर ही पात्रेही अनेक पिढ्यांना परिचित आहेत.

शोले चित्रपटातील सुपरहिट गाण्यांची मेजवानी आजही रसीकांचं भरभरून मनोरंजन करते. ‘शोले’च्या यशात चित्रपटातील गाण्यांचा मोठा वाटा होता. यातील प्रत्येक गाणे लोकप्रिय झाले. ‘ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे’ आजही मैत्रीचे प्रतीक मानले जाते, तर होळीच्या दिवशी ‘होली के दिन दिल मिल जाते हैं’ची आठवण होते. ‘महबूबा महबूबा’ही आजपर्यंत लोकप्रिय आहे.

कोणत्या गाण्याला कोणाचा आवाज? ‘ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे’ किशोर कुमार आणि मन्ना डे यांनी गायले. ‘कोई हसीना जब रूठ जाती है’ किशोर कुमार यांनी गायले. ‘होली के दिन दिल मिल जाते हैं’ लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात आहे. ‘जब तक है जां जाने जहां’ लता मंगेशकर यांनी गायले. ‘महबूबा महबूबा’ आर. डी. बर्मन यांच्या आवाजात आहे. जयच्या मृत्यूनंतर ‘ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे’चे सॅड व्हर्जन किशोर कुमार यांनी गायले.

15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट सुरुवातीला स्लो ओपनर ठरला. मात्र नंतर त्याने वेग पकडला. रमेश सिप्पी दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, संजीव कुमार, अमजद खान, जया बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. गब्बरविरोधातील संघर्ष आणि जय-वीरूची मैत्री यामुळे ‘शोले’ आजही हिंदी सिनेमाचा क्लासिक मानला जातो.

Follow Us
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा
दहीहंडी उत्सवात नियमभंग; पुणे नागपुरात 28 जणांवर गुन्हे दाखल
दहीहंडी उत्सवात नियमभंग; पुणे नागपुरात 28 जणांवर गुन्हे दाखल
भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या...
भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... अमित शहा...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... शहांचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप,
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप, व्हिडीओ व्हायरल
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर...
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर घात केला अन्...
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरे..
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरेंनी थेट...
3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! सामंत, लाडांनी आकडेवारीच सांगितली
Maratha Reservation | मराठवाड्यात 3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! उदय सामंत-प्रसाद लाडांनी आकडेवारीच सांगितली
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली;12 तारखेला अंतरवालीत होणार...
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली; 12 तारखेला अंतरवालीत होणार बैठक