AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुपरस्टार असूनही केलं मोलकरीण म्हणून काम, 14 व्या वर्षीच झालं लग्न, पार्टनरनेच दिला मोठा धक्का

14 व्या वर्षी लग्नाच्या बेडीत अडकली ही अभिनेत्री. लग्नानंतर मोलकरीण म्हणून केलं काम. शेवटी पार्टनरनेच केलं आयुष्य बरबाद. दिलेत 450 हून अधिक चित्रपट.

सुपरस्टार असूनही केलं मोलकरीण म्हणून  काम, 14 व्या वर्षीच झालं लग्न, पार्टनरनेच दिला मोठा धक्का
| Updated on: Sep 09, 2026 | 6:38 PM
Share

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सिल्क स्मिता. आपल्या ग्लॅमरस अंदाजासोबतच दमदार व्यक्तिमत्त्व आणि नृत्यामुळे त्यांनी अल्पावधीतच सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनाला अनेक वर्षे उलटली असली तरी त्यांचं आयुष्य, संघर्ष आणि लोकप्रियता आजही चर्चेचा विषय ठरते. त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावता येतो की, चित्रपटात सिल्क स्मिता असणार असल्याचं कळल्यानंतर वितरक तो चित्रपट घेण्यास उत्सुक असायचे.

मात्र, ज्या प्रसिद्धीने त्यांना उंचीवर नेलं, त्याच यशाने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणीही निर्माण केल्या. आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या सिल्क यांना लहान वयातच शिक्षण सोडावं लागलं. त्यानंतर त्यांनी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी घरकामही केलं.

वयाच्या 14 व्या वर्षी झालं लग्न

सिल्क स्मिता अवघ्या 14 वर्षांच्या असताना त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचं एका वयस्कर व्यक्तीसोबत लग्न लावून दिलं. या वैवाहिक आयुष्यात त्यांना अनेक अडचणी आणि कथित छळाचा सामना करावा लागला. सुमारे दोन वर्षांनंतर त्यांनी हे नातं सोडलं आणि स्वतःच्या बळावर आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला.

उदरनिर्वाहासाठी सुरुवातीला त्यांनी घरांमध्ये काम केलं. त्यानंतर चित्रपटाच्या सेटवर ‘टच-अप आर्टिस्ट’ म्हणून काम करण्याची संधी मिळाली. याच माध्यमातून त्यांचा सिनेसृष्टीशी जवळचा संबंध आला. चेन्नईतील एका स्टुडिओमध्ये काम करत असताना दिग्दर्शक वीनू चक्रवर्ती यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि त्यांनी सिल्क यांच्यातील अभिनयाची क्षमता ओळखली.

450 हून अधिक चित्रपटांत काम

सिल्क स्मिता यांचा पडद्यावरील आकर्षक अंदाज आणि नृत्याची खास शैली प्रेक्षकांना प्रचंड भावली. त्यांच्या डान्स नंबरना विशेष लोकप्रियता मिळाली. त्यामुळे चित्रपटात त्यांची उपस्थिती हा निर्मात्यांसाठी जणू यशाचा फॉर्म्युला मानला जाऊ लागला.

आपल्या सुमारे 18 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 450 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केल्याचं सांगितलं जातं. एका डान्स सीक्वेन्ससाठी त्या सुमारे 50 हजार रुपये मानधन घेत असत, जी त्या काळातील मोठी रक्कम होती. अनेकदा त्या दिवसाला दोन ते तीन गाण्यांचं शूटिंग करत असत. 1982 मध्ये रजनीकांत यांच्यासोबत ‘मूंद्रू मुगम’ या चित्रपटातही त्यांनी काम केलं. 23 सप्टेंबर 1996 रोजी सिल्क स्मिता त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळल्या. त्यावेळी त्या अवघ्या 35 वर्षांच्या होत्या.

Follow Us
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा
दहीहंडी उत्सवात नियमभंग; पुणे नागपुरात 28 जणांवर गुन्हे दाखल
दहीहंडी उत्सवात नियमभंग; पुणे नागपुरात 28 जणांवर गुन्हे दाखल
भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या...
भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... अमित शहा...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... शहांचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप,
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप, व्हिडीओ व्हायरल
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर...
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर घात केला अन्...
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरे..
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरेंनी थेट...
3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! सामंत, लाडांनी आकडेवारीच सांगितली
Maratha Reservation | मराठवाड्यात 3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! उदय सामंत-प्रसाद लाडांनी आकडेवारीच सांगितली
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली;12 तारखेला अंतरवालीत होणार...
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली; 12 तारखेला अंतरवालीत होणार बैठक
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे...
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंचा व्हिसीद्वारे जबाब