TVK Vijay : विजयच्या TVK पक्षाचे मुस्लिम आमदार मुस्तफा यांचं सनातन धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य

TVK Vijay : तामिळनाडूत नव्याने सत्तेवर आलेल्या थलपती विजय यांच्या TVK पक्षाचा मुस्लिम आमदार व्हीएमएस मु्स्तफाने सनातन धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टालिन यांच्याप्रमाणेच बोलले आहेत.

TVK Vijay : विजयच्या TVK पक्षाचे मुस्लिम आमदार मुस्तफा यांचं सनातन धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य
Mustafa-Vijay
| Updated on: May 14, 2026 | 1:50 PM

तामिळनाडू विधानसभेचे नवे विरोधी पक्षनेते आणि द्रमुक आमदार उदयनिधी स्टालिन यांनी नुकतच सनातन धर्माबद्दल एक वक्यव्य केलं होतं. त्यावरुन तामिळनाडूच्या राजकारणात वाद सुरु झाला आहे. विधानसभेत बोलताना उदयनिधी स्टालिन म्हणाले की, “सनातन धर्म लोकांची विभागणी करतो. म्हणून हा धर्मच संपवला पाहिजे” त्यांच्या या वक्तव्यावरुन तामिळनाडूच्या राजकारणात वाद सुरु झाला आहे. आता तामिळनाडूच्या राजकारणात नव्याने सत्तेवर आलेल्या TVK पक्षाचे मुस्लिम आमदार व्हीएमएस मु्स्तफा यांनी उदयनिधी स्टालिनच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. तामिळनाडू विधानसभेबाहेर बोलताना मुस्तफा म्हणाले की, “आम्ही सुद्धा पेरियार आणि आंबेडकर यांचे आदर्श मानतो.आम्ही सुद्धा सनातन नष्ट करण्याच्या लढ्यात उतरलो आहोत”

सनातन लोकांची विभागणी करतो म्हणून तो धर्म नष्ट केला पाहिजे असं उदयनिधी म्हणाले होते.त्यांनी याआधी 2023 मध्ये सुद्धा सनातन धर्माबद्दल असचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. भाजपने उदयनिधीच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेत जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. तामिळनाडू भाजप प्रमुख नैनार नागेंद्रन यांनी उदयनिधीवर हिंदू धर्माचा अपमान करत असल्याचा आरोप केला होता. हिंदूधर्माबद्दलच्या या द्वेषामुळे तुझी घसरण होईल अशी टीका नागेंद्रन यांनी केली होती.

मी आणि मुख्यमंत्र्यांनी एकाच कॉलेजमधून शिक्षण घेतलय

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सुद्धा उदयनिधी स्टालिनच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. “खिल्ली उडवणं आणि लाखो लोकांच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं याला हिम्मत म्हणत नाही हा उद्धटपणा झाला” अशी टीका मालवीय यांनी केली होती. मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या शपथविधीवेळी ज्या क्रमाने गाणी वाजवण्यात आली, त्यावर सुद्धा उदयनिधीने आक्षेप घेतला होता. ‘वंदे मातरम’ गीत पहिलं वाजवण्यात आलं. ते राज्यातील अनेकांना पटलेलं नाही अस उदयनिधीचं म्हणणं होतं. मी आणि मुख्यमंत्र्यांनी एकाच कॉलेजमधून शिक्षण घेतलं आहे असं उदयनिधी म्हणाला. सत्ताधारी आणि विरोधक वेगवेगळ्या रांगेत बसतात. पण तामिळनाडूच्या विकासासाठी सर्वांनी मिळून एकत्र काम केलं पाहिजे असं उदयनिधी म्हणाले.

Follow Us