
भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो, म्हणून अमेरिकेनं भारतीय वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफसंदर्भात घोषणा केली होती. भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये, अशी अमेरिकेची भूमिका आहे. भारताकडून मिळालेला पैसा रशिया हा युद्धासाठी वापरत असल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला आहे. दरम्यान अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफचा फटका हा भारतापेक्षा अमेरिकेलाच मोठ्या प्रमाणात बसत असल्याचं आता आकडेवारीवरून समोर आलं आहे. एकीकडे अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे भारत आणि अमेरिकेमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. मात्र भारतानं या काळात चीन आणि रशियाशी जवळीक वाढवली असून, निर्यातीचे आकडे देखील वाढले आहेत.
आता अमेरिकेमधून एक मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफचा अमेरिकेलाच प्रचंड फटका बसला आहे. अमेरिकेनं भारताच्या गारमेंटवर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. त्याचा मोठा परिणाम आता अमेरिकन बाजारपेठेवर झाला आहे. भारतीय गारमेंटवर अमेरिकेत 50 टक्के टॅरिफ लावण्यात आल्यानं अमेरिकेत भारतीय कपडे हे प्रचंड महाग झाले आहेत, अमेरिकेतल्या कंपन्यांनी भारतामधून येणाऱ्या कपड्यांची खरेदी बंद केल्यामुळे अमेरिकेत सध्या कपड्यांचा प्रचंड तुटवडा जाणवत असून, भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आता अमेरिकेला गारमेंट्ससाठी ज्या देशांवर टॅरिफ लावण्यात आलेला नाही, अशा देशांवर अवलंबून रहावं लागत आहे.
भारतामधून होणाऱ्या कपड्यांच्या पुरवठ्याला अचानक ब्रेक लागल्यानं अमेरिकेतले गारमेंट्स व्यवसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांचं प्रचंड नुकसान होत आहे, तसेच किरकोळ आणि होलसेल बाजारपेठेत देखील कपड्यांचे भाव प्रचंड वाढले आहेत, कपड्यांच्या बाजारपेठेत सध्या चिंतेचं वातावरण आहे, त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं देखील टेन्शन वाढलं आहे. अमेरिकेकडून गारमेट्ससाठी आता पर्याय मार्ग शोधण्याचं काम सुरू आहे. मात्र त्यात अजून तरी यश आलेलं नाही. अमेरिकेमध्ये कपड्यांच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. सर्वसामान्य लोकांना खरेदी देखील परवडत नाहीये.