AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी कोरी कार खरेदीला जाताय? मग या गोष्टी अगोदर जाणून घ्या, नाहीतर माराल डोक्याला हात

First Car Buying Guide: दारासमोर चार चाकी असावी ही अनेकांची इच्छा असते. पहिल्यांदा नवीन कोरी कार खरेदीला जात असाल तर अगोदर या गोष्टी अगोदर जाणून घ्या. नाहीतर तुम्हाला पश्चाताम करण्याची वेळ येऊ शकते. तेव्हा कार खरेदी करताना काळजी घ्या.

नवी कोरी कार खरेदीला जाताय? मग या गोष्टी अगोदर जाणून घ्या, नाहीतर माराल डोक्याला हात
पहिली कार
| Updated on: Mar 12, 2026 | 4:49 PM
Share

First Car Buying Guide: पहिल्यांदा कार खरेदी करणे हा जीवनातील एक अविस्मरणीय क्षण असतो. ही केवळ कार खरेदी नसते. तर कुटुंबासाठीची ती गरज असते. त्यामुळे वेळेची बचत होते आणि इच्छित स्थळी पटकन जाते येते. पण अनेकदा कार खरेदी करण्याचा उत्साहच इतका असतो की अनेक गोष्टींकडे खरेदीदार दुर्लक्ष करतो. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. तर कार खरेदीनंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. तेव्हा कार खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी अगोदर समजून घ्या.

बजेटची अगोदर काळजी करा

जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कार खरेदी करण्याविषयी विचार करता. तेव्हा त्याच्या बजेटची तरतूद करा. अनेकदा कारची किंमत किती तितकी तरतूद केली जाते. पण कार खरेदीसह नोंदणी शुल्क, विमा, रस्ता करा आणि काही गरजेच्या एक्सेसरीजसाठी खर्च करावा लागतो. जर कार तुम्ही कर्जावर खरेदी करत असाल तर दरमहा EMI भरावा लागतो. त्यामुळे बजेट वाढते. तर तुमचे उत्पन्न आणि खर्च याचे गणित सुद्धा तुम्हाला तपासणे आवश्यक आहे.

तुमच्या गरजेनुसार योग्य कार खरेदी करा

प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे कारची निवड करताना ती काळजीपूर्वक करा. जर तुमचा शहरापुरताच वापर असेल तर शहरात वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता कॉम्पॅक्ट, छोटी कार तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तर लांबचा प्रवास करावा लागत असेल तर मोठी कार अथवा SUV अधिक आरामदायक ठरेल. त्यामुळे चांगली कार खरेदी करण्याकडे लक्ष द्या.

मायलेज आणि सुरक्षा

भारतात कार खरेदी करताना मायलेज आणि सुरक्षा फीचर्सवर अधिक लक्ष द्यावे लागते. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे कारचे मायलेज आणि फ्युएल टाईपचा विचार करणे आवश्यक आहे. पुढे अधिक खर्च टाळण्यासाठी आणि वारंवार सर्व्हिस आणि मेंटनन्सविषयी विचार करणे आवश्यक आहे. सुरक्षा फीचर्सकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे पहिली कार खरेदी करताना कोणतीही गडबड न करता शांत डोक्याने आणि सारासार विचार करून खरेदी करा.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?