रेल्वे नियमात मोठा बदल,1 जुलैपासून हे लोक तिकीट बुक करु शकणार नाहीत..

रेल्वे तिकीटांचा काळाबाजार रोखण्यासाठी आयआरसीटीसी नेहमी सिस्टीममध्ये बदल करीत असते. परंतू तरीही या सिस्टीमला छेद करणारे निरनिराळी सॉफ्टवेअर बाजारात विकत मिळतात, त्यामुळे तत्काळ सेवेला आणखी मजबूत केले आहे.

रेल्वे नियमात मोठा बदल,1 जुलैपासून हे लोक तिकीट बुक करु शकणार नाहीत..
| Updated on: Jun 11, 2025 | 6:44 PM

रेल्वे मिनिस्ट्रीच्यावतीने एक मोठा निर्णय घेतला होता. रेल्वे मंत्रालयाने बुधवारी एक मोठा निर्णय घेतला. आता आधारकार्ड प्रमाणीकरण नसेल तर युजरला तत्काळचे तिकीट काढता येणार नाही. रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की तिकीट बुकींगसाठी आता नियमात मोठे बदल केले आहेत. 1 जुलै 2025 पासून हे नवीन नियम लागू केले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर एक पोस्ट करुन ही माहीती दिली आहे.

रेलवे मंत्रालयाने जारी केले सर्क्युलर

रेल्वे मंत्रालयाने 10 जून 2025 रोजी एक सर्क्युलर सर्व झोनला जारी केले होते. तत्काल तिकीट सेवेचा लाभ योग्य प्रवाशांना मिळावा यासाठी आता युजरना त्यांचे आधारकार्डचे ई-व्हेरीफिकेशन करावे लागणार आहे. त्यामुळे 1 जुलै 2025 पासून आयआरसीटीसीच्या वेबसाईट वा ऐपद्वारे केवळ आधार व्हेरीफिकेश केलेले युजरच तिकीट बुक करु शकणार आहेत. तसेच यानंतर 15 जुलै 2025 पासून Tatkal Booking साठी आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरण देखील अनिवार्य करण्यात आले आहे.

या शिवाय रेल्वे तिकीट एजंट देखीस आता तत्काळ तिकीट बुकींग ओपन झाल्यानंतर ३० मिनिटांपर्यंत तिकीट बुक करु शकणार नाहीत. AC क्लाससाठी सकाळी 10:00 वा. ते 10:30वा.पर्यंत वेळ असणार आहे. तर नॉन एसी क्लाससाठी सकाळी 11.30 वाजेपर्यंत ही वेळ असणार आहे.

येथे पाहा पोस्ट –

केवळ 10% यूजर्स आधार व्हेरीफाईड

IRCTC च्यामते देशात त्यांच्या वापरकर्त्यांची संख्या 13 कोटीहून अधिक आहे. परंतू हैराण करणारी ही बाब आहे की देशात केवळ १० टक्के युजरच आधार व्हेरीफाईड आहेत.  त्यामुळे  ‘तत्काल’ तिकीट बुकिंग प्रक्रियेला आणखी मजबूत बनवण्याच्या उद्देश्याने भारतीय रेल्वे ( Indian Railway) ने नियमांना कठोर करीत केवळ आधार व्हेरीफाईड आयआरसीटीसी अकाऊंटलाच Online Tatkal Ticket Booking करण्याची परवानगी दिलेली आहे.

बोगस आयडीवर सरकार कठोर

Tatkal Ticket बुकिंगमध्ये दलालाचा सहभाग वाढल्यानंतर सरकारने बोगस आयडी वाल्या युजरवर अंकुश लावण्यास सुरुवात केली. आयआरसीटीसीने गेल्या एक वर्षात 3.5 कोटी बोगस यूजर आयडी ब्लॉक केल्या आहेत. त्यानंतर या प्लॅटफॉर्मवर सिस्टमवरील ताण कमी झाला आहे. आता रेल्वे मंत्रालयाने या प्रकरणात मोठा बदल करीत आता आधार प्रमाणीकरणाचा नियम लागू केला आहे.