
हिमाचल प्रदेशात नैसर्गिक संकटाने तेथील जनजीवन ठप्प झाले आहे. अनेक रस्ते भूस्खलनाने बंद पडले आहेत. ढगफुटी आणि पुराने येथे देशभरातील पर्यटक अडकून पडले आहेत. महाराष्ट्रातीलही ६०० पर्यटक येथे अडकून पडले आहेत. गेल्या शतकात हिमाचल प्रदेशचे तापमान सरासरी 1.6 °C तक वाढले आहे. त्यानंतर येथील पर्यावरणात बदल झाला आहे. नैसर्गिक संकटाचे प्रमाण आणि तीव्रता वाढत चालली आहे.
हिमाचलात अतिवृष्टी आणि ढगफुटी : वाढत्या तापमानामुळे वातावरणात अधिक आद्रता तयार झाली आहे. त्यामुळे अचानक मोठी पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे flash flood आणि भूस्खलन वाढले आहे.
भूस्खलन आणि दरड कोसळणे : डोंगर कापल्याने रस्ते बांधल्याने पर्वतातील स्थिरता भंग झाली आहे. त्यातच जोरदार पर्जन्यवृष्टीने येथील दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे.
मानवी कारणे : रस्ते, बोगदे, नदी किनाऱ्यावरील संरचना वाढवणे, जल विद्युत योजनामुळे पर्वतावरील असंतुलन वाढले आहे.
हिमाचलचा सुमारे ४५ टक्के क्षेत्र भूस्खलनस, पुर आणि हिमस्खलनाची उच्च जोखीमेखाली आहे. त्यामुळे जर जलद उपाय योजले नाहीत तर साल २१०० मध्ये सरासरी तापमानात अतिरिक्त 3-5 °C वाढ होऊ शकते. त्यामुळे नैसर्गिक संकटाचे तीव्रता आणखीन वाढण्याची शक्यता पर्यावरण तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
1. विकास कामे
पर्तवावरील खोदकाम आणि बांधकामांवर कठोर नियंत्रण
नदीच्या किनाऱ्यापासून 5-7 m आणि नदीपासून 25 m दुरवरच बांधकाम करावे.
मातीचे परीक्षण आणि भू-तंत्रज्ञानाचा वापर करणे अनिवार्य करणे.
2. नैसर्गिक संरक्षण
पर्वताती वन संरक्षण, वनीकरण आणि वृक्षारोपणाला प्रोत्साहन देऊन मातीची धूप थांबवावी
जल विद्युत योजना आणि बोगद्यांची निर्मितीच्या जमीनवरील परिणामाचा अभ्यास करावा
3. जागरुकता आणि नियमन
इमारत निर्मिती आणि पर्यावरण नियमांचे सक्तीने पालन
वीज आणि पाण्याचे कनेक्शन परवानगी शिवाय उपलब्ध होऊ नये
मानवकेंद्रीभूत विकास (उदा.पर्यटन, बस प्रवास ) यांचे नियंत्रण करावे
4. स्थानिकांची भागीदारी
पर्वतात राहणाऱ्या जनतेच्या समस्या ऐकून त्यांच्या सूचनेनुसार योजना आखाव्यात