Karnataka : स्वातंत्र्यदिनीच कर्नाटकात कर्फ्यू! सावरकरांच्या पोस्टरवरुन तणाव, नेमका काय आहे वाद?

Karnataka News : सोशल डेमोक्रेटी पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी अशाच प्रकारच्या आणखी एका घटनेत सावरकरांचं नाव हटवल्यामुळे मंगळुरुमधील सुरथकल जंक्शनवर बॅनल लावण्यात आला होता.

Karnataka : स्वातंत्र्यदिनीच कर्नाटकात कर्फ्यू! सावरकरांच्या पोस्टरवरुन तणाव, नेमका काय आहे वाद?
कर्नाटकात जमावबंदी
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 15, 2022 | 5:32 PM

कर्नाटक (Karnataka Curfew News) राज्यातील शिवमोग्गामध्ये स्वातंत्र्यदिनीच (Independence Day) कर्फ्यू अर्थात जमावबंदी लावण्याची वेळ ओढावली. वीर सावरकर यांच्या पोस्टरवरुन झालेल्या वादामुळे तणाव वाढला आणि अखेर प्रशासनानं खबरदारी म्हणून कर्फ्यू लागू केलाय. त्यामुळे कर्नाटकात शिवमोग्गमध्ये (Shivamogga) तणावपूर्ण शांतता पाहायला मिळतेय. तसंच पोलीस बंदोबस्तामध्येही वाढ करण्यात आली आहे. शिवमोग्गा येथील अमीर अहमद सर्कल इथं वीर सावरकर यांचे पोस्टर लावण्यात आले होते. हे पोस्टर हिंदू समर्थकांद्वारा लावण्यात आल्याचा आरोप काही मुस्लिम युवकांनी केल्याचं वृत्त समोर आलं आहे. हिंदू समर्थक समूहांनी लावलेल्या विनायक दामोदर सावरकर यांच्या पोस्टरला मुस्लिम युवकांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर हे पोस्टर हटवण्यात आले होते. दरम्यान, यानंतर हिंदू समर्थक कार्यकर्त्यांनी सावकरांचे पोस्टर काढण्याच्या प्रयत्नांविरोधात निषेध नोंदवला. त्यामुळे तणाव वाढला. अखेर प्रशासनाला खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदीचं कलम लागू करावं लागलंय.

नेमकं काय प्रकरण?

याआधी सोशल डेमोक्रेटी पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी अशाच प्रकारच्या आणखी एका घटनेत सावरकरांचं नाव हटवल्यामुळे मंगळुरुमधील सुरथकल जंक्शनवर बॅनल लावण्यात आला होता. मंगळुरु पालिकेने एका सर्कलला सावकरांचं नाव देण्याचं ठरवलं होतं. त्याबाबतचा प्रस्तावही मंजूर केला होता. मंगळुरु उत्तरचे भाजप आमदार वाई भरत शेट्टी यांनी सर्कला वीर सावरकर यांचं नाव दिलं जावं अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीचा प्रस्तावही पालिकेत मान्य करण्यात आला होता. आता फक्त अधिकृत घोषणेची प्रतीक्षा होती.

सुरक्षेखातर जमावबंदी

या दरम्यान, एसडीपीआईचे स्थानिक नेत्यांनी सावरकरांचं नाव देण्यावर आक्षेप नोंदवला होता. ज्या ठिकाणच्या सर्कलला नाव देण्याचा विचार सुरु आहे, तो एक संवेदनशील भाग असून त्या भागातील सर्कलला सावरकरांचं नाव देऊ नये, अशी भूमिका काहींनी घेतली होती. त्यावरुन वाद होऊन परिस्थिती चिघळली. अशातच पोस्टरचा वाद झाला. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अखेर स्वातंत्र्यदिनीच कनार्टकातील शिवमोग्गा इथं जमावबंदी लागू करण्यात आलीय.