Ahmedabad Video: काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! विमान अपघातानंतर विद्यार्थांनी मारल्या बाल्कनीमधून उड्या

सध्या सोशल मीडियावर अहमदाबाद विमान अपघातानंतरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ काळजाचा ठोका चुकवणारा आहे.

Ahmedabad Video: काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! विमान अपघातानंतर विद्यार्थांनी मारल्या बाल्कनीमधून उड्या
Plan Crash
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 17, 2025 | 2:18 PM

अहमदाबाद येथे 12 जून 2025 रोजी मोठा विमान अपघात घडला. अहमदाबादहून लंडनला जाणारी बोईंग 787-8 ड्रीमलाइनर फ्लाईल टेकऑफनंतर काही क्षणातच बी.जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला जाऊन धडकली. या विमानात 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यापैकी फक्त एक प्रवासी, विश्‍वास कुमार रमेश हा बचावला. या दुर्घटनेत 241 प्रवाशांसह जमिनीवर असलेल्या 38 जणांचा मृत्यू झाला, एकूण मृतांचा आकडा 279 वर पोहोचला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

विमानाने दुपारी 1 वाजून 39 मिनिटांनी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले होते. पण उड्डाणानंतर लगेचच पायलट कॅप्टन सुमीत सभरवाल यांनी मेडे कॉल जारी केला आणि विमान कोसळले. प्राथमिक तपासात दोन्ही इंजिनांमधील अचानक पॉवर कट झाल्याचे संभाव्य कारण समोर आले आहे. विमानाच्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (ब्लॅक बॉक्स) सापडले असून, भारत आणि अमेरिका संयुक्तपणे तपास करत आहेत.

वाचा: ‘ब्लॅक बॉक्स’मधून उलगडणार विमान पडण्यामागचे रहस्य, पण ब्लॅक बॉक्स म्हणजे नक्की काय असतं?

या दुर्घटनेत माजी गुजरात मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही मृत्यू झाला, ज्यांचे पार्थिव डीएनए चाचणीनंतर ओळखले गेले. रविवारी संध्याकाळपर्यंत 86 प्रवाशांचे आणि क्रू मेंबर्सचे डीएनए जुळले असून, 76 मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले आहेत. आता या घटनेनंतरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांचा खळबळजनक व्हिडिओ

अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर बी.जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले, याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये विद्यार्थी हॉस्टेलच्या बाल्कनीतून उड्या मारताना दिसत आहेत. कारण विमान कोसळल्यानंतर लागलेल्या आगीमुळे आणि धुरामुळे परिस्थिती भीषण झाली होती. विमान हॉस्टेलच्या मेस क्षेत्रात कोसळले, जिथे दुपारच्या जेवणाची वेळ होती. यामुळे अनेक विद्यार्थी आणि कर्मचारी जखमी झाले, तर काहींचा मृत्यू झाला.