‘ब्लॅक बॉक्स’मधून उलगडणार विमान पडण्यामागचे रहस्य, पण ब्लॅक बॉक्स म्हणजे नक्की काय असतं?
यंत्रणांनी अपघातस्थळी विखुरलेल्या विमानाच्या ढिगाऱ्यातून पुराव्यांचा शोध सुरू केला. त्यामध्ये त्यांना ब्लॅक बॉक्स सापडला आहे. आता हा बॉक्स नेमका काय असते जाणून घ्या...

गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे एक बोइंग 737-8 ड्रीमलाइनर विमान कोसळले. हे विमान अहमदाबादहून लंडनला जाणारे प्रवासी विमान होते. आतापर्यंत या अपघातात एकूण 265 मृत्यूंची पुष्टी झाली आहे. दरम्यान, संबंधित यंत्रणांनी अपघातस्थळी विखुरलेल्या विमानाच्या ढिगाऱ्यातून पुराव्यांचा शोध सुरू केला आहे. या शोधात सर्वात महत्त्वाची गोष्ट जी सर्वात पहिले शोधली जाते ती म्हणजे विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ (Black Box). तांत्रिक भाषेत याला फ्लाइट डेटा रेकॉर्डर (Flight Data Recorder) म्हणतात.
मग ते सिव्हिल विमान असो, लष्करी विमान असो, किंवा हेलिकॉप्टर असो, प्रत्येकामध्ये हा ब्लॅक बॉक्स असतो. संपूर्ण उड्डाणादरम्यान, अगदी जमिनीवर उभे असतानाही, हा ब्लॅक बॉक्स विमानाची माहिती रेकॉर्ड करत राहतो. म्हणूनच याचे खरे नाव फ्लाइट रेकॉर्डर आहे. यामुळे सर्व लपलेली माहिती समोर येते, म्हणून कालांतराने याला ब्लॅक बॉक्स असे संबोधले जाऊ लागले. चला तर मग जाणून घेऊया की हा ब्लॅक बॉक्स नेमका काय आहे आणि तो कसा काम करतो?
वाचा: 2 पक्षांमुळे 50 प्रवाशांचा मृत्यू, अहमदाबाद विमान अपघातामागील धक्कादायक कारण आलं समोर
ब्लॅक बॉक्स
नावात ब्लॅक असले तरी हा बॉक्स सामान्यतः केशरी रंगाचा असतो. केशरी रंग यासाठी की अपघाताच्या परिस्थितीत त्याच्या रंगामुळे तो शोधणे सोपे जाते. हे स्टील आणि टायटॅनियमपासून बनलेले एक रेकॉर्डिंग डिव्हाइस आहे. यामध्ये अनेक प्रकारचे सिग्नल, संभाषण आणि तांत्रिक डेटा रेकॉर्ड होत राहतात. यामध्ये दोन प्रकारचे रेकॉर्डर असतात: डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (DFDR) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR).
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR)
हे कॉकपिटमध्ये होणारी पायलट आणि त्याच्या सहकाऱ्यांमधील संभाषणे आणि कॉकपिटमधील इतर आवाज रेकॉर्ड करते. याशिवाय, कॉकपिट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) यांच्यातील रेडिओ संभाषणेदेखील यात रेकॉर्ड होतात. एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजे जमिनीवरील कर्मचारी जे उड्डाणादरम्यान पायलटला मदत करतात. ते रेडिओद्वारे संपूर्ण उड्डाणादरम्यान पायलटच्या संपर्कात असतात.
डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (DFDR)
DFDR विमानाची गती, उंची, विमानाची उभ्या दिशेतील हालचाल, उड्डाणाचा मार्ग यासारखे अनेक डेटा रेकॉर्ड करते. याशिवाय इंजिनची माहिती जसे इंधनाचा प्रवाह, थ्रस्ट (धक्का) यासारखी माहितीही साठवते. याव्यतिरिक्त, फ्लाइट कंट्रोल, दाब, इंधन इत्यादी सुमारे 90 प्रकारच्या डेटाची 24 तासांपेक्षा जास्त रेकॉर्डेड माहिती DFDR मध्ये असते.
सुरुवातीच्या काळात
सुरुवातीच्या काळात ब्लॅक बॉक्सवर मर्यादित डेटा वायर किंवा फॉइलवर रेकॉर्ड केला जायचा. नंतर मॅग्नेटिक टेपचा वापर झाला. आधुनिक विमानांमध्ये सॉलिड स्टेट मेमरी चिप्सचा वापर केला जातो. प्रत्येक रेकॉर्डिंग डिव्हाइसचे वजन सुमारे 4.5 किलोग्रॅम असते. हे सामान्यतः स्टील किंवा टायटॅनियमसारख्या मजबूत सामग्रीपासून बनलेले असते आणि अत्यधिक उष्णता, थंडी किंवा ओलाव्यापासून सुरक्षित असते. ब्लॅक बॉक्स विमानाच्या मागील भागात बसवलेला असतो, कारण बहुतेक प्रकरणांमध्ये अपघाताचा प्रभाव येथे सर्वात कमी असतो. पाण्याखाली ब्लॅक बॉक्स शोधण्यासाठी त्यामध्ये एक डिव्हाइस बसवलेले असते, जे 30 दिवसांपर्यंत अल्ट्रासाऊंडसारखे सिग्नल पाठवते.
