Terrorist attack threat : मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त वक्तव्य, अल कायदाकडून दहशतवादी हल्ल्याची धमकी, सूत्रांची माहिती

भारताला दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. अल कायदा या दहशतवादी संघटनेनं ही धमकी दिली आहे. नवी दिल्ली, मुंबईसह उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये आत्मघातकी हल्ले करण्याची धमकी मिळाली आहे.

Terrorist attack threat : मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त वक्तव्य, अल कायदाकडून दहशतवादी हल्ल्याची धमकी, सूत्रांची माहिती
| Edited By: | Updated on: Jun 07, 2022 | 11:58 PM

नवी दिल्ली : भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत (Mohammad Paigambar) अनुद्गार काढल्यावरुन देश अणि विदेशात मोठी खळबळ माजली आहे. भाजपने नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांची प्राथमिक सदस्यता काढून घेतली आहे. तसंच मीडिया प्रभारी नवीन जिंदल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर आता भारताला दहशतवादी हल्ल्याची धमकी (Terrorist Attack Threat) मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. अल कायदा या दहशतवादी संघटनेनं ही धमकी दिली आहे. नवी दिल्ली, मुंबईसह उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये आत्मघातकी हल्ले करण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे देशभरातील सुरक्षा यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आलेत.

‘पैगंबराचा अपमान करणाऱ्यांना मारुन टाकू’

भाजप प्रवक्त्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. कानपुरात मोठी दंगल उसळली, दोन समाजात तेढ निर्माण झाली. त्यानंतर आता अल कायदाने भारतात आत्मघातकी हल्ल्याची धमकी दिली आहे. आम्ही आमच्या पैगंबराचा अपमान करणाऱ्यांना मारुन टाकू. आम्ही आमच्या शरिरावर आणि आमच्या मुलांच्या शरिरावर स्फोटकं बांधून पैगंबरांचा अपमान करणाऱ्यांना उडवून टाकू. अपमान करणाऱ्यांना दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये आपल्या शेवटाची वाट पाहावी लागेल’.

AQIS ने माध्यमांना एक चिठ्ठी देत दिली धमकी

भारतात आत्मघातकी हल्ल्याची धमकी अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेन्ट (AQIS) ने दिली आहे. AQIS ने माध्यमांना एक चिठ्ठी देत भारतात हिंदूंची हत्या करण्याचा इशारा दिलाय. या चिठ्ठीत लिहिलं आहे की, पैगंबरांविरोधात जगातील कुणीही व्यक्ती बोलत असेल तर आम्ही त्याला आत्मघातकी हल्ल्यात मारुन टाकू. अलकायदाने हिंदूंना भगवा दहशतवाद अशी उपमा देत भारतावर कब्जा करणारा असं संबोधलं आहे. तर स्वत:ला पैगंबराच्या प्रतिष्ठेसाठी लढणारे असं म्हटंलय.