सरकारची मोठी कारवाई, २४२ अवैध बेटिंग आणि गॅम्बलिंग वेबसाईट लिंक ब्लॉक

केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंग आणि अवैघ बेटिंग वेबसाईट विरोधात हातोडा उगारला आहे. सरकारने २४२ अवैघ बेटिंग आणि गॅम्बलिंग वेबसाईटवर लिंक ब्लॉक केल्या आहेत.

सरकारची मोठी कारवाई, २४२ अवैध बेटिंग आणि गॅम्बलिंग वेबसाईट लिंक ब्लॉक
blocking 242 illegal betting and gambling website links
| Updated on: Jan 16, 2026 | 10:16 PM

केंद्र सरकारने शुक्रवारी २४२ अवैघ बेटिंग आणि गॅम्बलिंग वेबसाईटवर लिंक ब्लॉक केल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत सुमारे ८ हजार अवैध बेटिंग आणि गॅम्बलिंगच्या वेबसाईट बंद झाल्या आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन गेमिंग एक्ट मंजूर झाल्यानंतर ही कारवाई वेगाने सुरु झाली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने शुक्रवारी माहिती देताना सांगितले की आज २४२ अवैध बेटिंग आणि गॅम्बलिंग वेबसाईटची लिंक ब्लॉक करण्यात आली आहे. आता पर्यंत ७,८०० हून अधिक अवैध बेटिंग आणि गॅम्बलिंग वेबसाईट बंद करण्यात आल्या आहेत. आणि ऑनलाईन गेमिंग एक्ट मंजूर झाल्यानंतर ही कारवाई वेगाने सुरु आहे.

 आर्थिक आणि सामाजिक नुकसान रोखण्यासाठी

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आजची कारवाई युजर्स, खास करुन तरुणांची सुरक्षा आणि अवैध ऑनलाईट बेटिंग आणि गॅम्बलिंग प्लॅटफॉर्मवर होणारी आर्थिक आणि सामाजिक नुकसान रोखण्यासाठी सरकारची प्रतिबद्दता दाखवत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट राष्ट्रपती द्रौपर्दी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात हा कायदा मंजूर झाल्यानंतर अखेर ऑनलाईन गेमिंग प्रमोशन आणि रेग्युलेशन बिल, २०२५ ला मंजूरी दिली होती. ज्यामुळे हा कायदा लागू झाला होता.

हा कायदा ई-स्पोर्ट्स आणि सोशल ऑनलाईन गेम्सला प्रोत्साहन देऊ इच्छितो परंतू नुकसानदायक पैसे उकळणारे गेमिंग, त्यांचे प्रमोशन आणि संबंधित फायनान्शियल ट्रांझक्शनवर बंदी घालतो. पैसेवाल्या ऑनलाईन गेम्समध्ये भाग घेणाऱ्यांना सजा होण्याच्या ऐवजी सर्व्हीस प्रोव्हायडर, एडव्हरटायजर, प्रमोटर्स आणि अशा प्लॅटफॉर्मला आर्थिक पुरवठा करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे. ऑनलाईन गेमिंग नियम गेल्यावर्षी १ ऑक्टोबर रोजी लागू झाला आहे.