AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hotel Rent : मुंबईत या हॉटेलमध्ये थांबले होते विरोधक, तिथले एक दिवसाचे भाडे तरी किती?

Hotel Rent : विरोधी पक्षांनी मुंबईत पुन्हा एकजुटीचे प्रदर्शन केले. मुंबईतील बैठकीसाठी देशातील झाडून 28 पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ही बैठक कलिना येथील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये झाली. त्यासाठी हॉटेलच्या 200 खोल्या बूक करण्यात आल्या होत्या. त्याचे भाडे तरी किती होते

Hotel Rent : मुंबईत या हॉटेलमध्ये थांबले होते विरोधक, तिथले एक दिवसाचे भाडे तरी किती?
| Updated on: Sep 02, 2023 | 5:54 PM
Share

नवी दिल्ली | 2 सप्टेंबर 2023 : विरोधी पक्षांची एकजूट पुन्हा मुंबईत दिसली. इंडिया आघाडीच्या (I.N.D.I.A Alliance) माध्यमातून बिगर भाजपा 28 पक्षांची मोट बांधण्यात आली आहे. ही बैठक दोन दिवस चालली. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी ही बैठक झाली. या बैठकीत अनेक विषयांवर तोडगा काढण्यात आला. अनेक महत्वाच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि मोठमोठ्या नेत्यांनी हजेरी लावली. मीडियातील वृत्तानुसार, ही बैठक कलिना येथील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये (Grand Hyatt Hotel) झाली. त्यासाठी हॉटेलच्या 200 खोल्या बूक करण्यात आल्या होत्या. उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष (शरद पवार) यांनी ही बैठक यशस्वी करुन दाखवली. यापूर्वीची बैठक बेंगळुरु येथे झाली होती.

30 सप्टेंबरपर्यंत सूटणार तिढा

इंडिया आघाडीच्या जागा वाटपात गिव्ह अँड टेक या आधारावर काही जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. जागा वाटपाबाबत काय फॉर्म्युला ठरला आहे, याविषयी सातत्याने इंडिया आघाडीतील नेत्यांना विचारण्यात येते. त्यावर पण लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या 30 सप्टेंबरपर्यंत इंडिया आघाडीकडून देशभरात लोकसभेच्या निवडणुकीसाठी जागा वाटप करण्यात येणार आहे.

कसे आहे हॉटेल ग्रँड हयात

हॉटेल ग्रँड हयातच्या वेबसाईटवर त्याची माहिती दिली आहे. त्यानुसार बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळ हे हॉटेल आहे. हे हॉटेल 10 एकर परिसरात 2004 मध्ये सुरु करण्यात आले. तेव्हापासून व्यावसायिक, उद्योजक, परदेशी पर्यटक आणि बॉलिवूडमधील अनेक सेलेब्रिटींचे ते आवडते हॉटेल आहे. शिकागोमधील Lohan Associates ने हॉटेलचे डिझाईन तयार केले आहे. या हॉटेलमध्ये 548 खोल्या आणि इतर सर्व्हिस अपार्टमेंट आहेत. या हॉटेलमध्ये चार रेस्टॉरंट Soma, 55 East, Celini आणि China House आहेत.

किती आहे भाडे

या हॉटेलमध्ये अनेक सुईट, रुम्स आणि अपार्टमेंट आहेत. या हॉटेलमध्ये डिप्लोमॅटिक सुईट, ग्रँड एक्झिक्युटिव्ह सुईट, ग्रँड सुईट किंग, प्रेसिडेंशिअल सुईट, वेरांदा सुईट किंग यांचा समावेश आहे. डिप्लोमॅटिक सुईटचे एका दिवसाचे भाडे 34,500 रुपये आहे, करासह ते 40,710 रुपये होते. प्रेसिडेंशिअल सुईटचे एकादिवसाचे भाडे 2,99,000 रुपये आहे. करासह ते 3,52,820 रुपये होते.

इतर रुम्ससाठी मोजा इतके रुपये

या हॉटेलमध्ये 12 वेगवेगळ्या प्रकारच्या रुम्स आहेत. तर आठ प्रकारचे अपार्टमेंट आहेत. या रुमचे एका दिवसाचे भाडे 11,000 रुपयांपासून ते 14,500 रुपयांपर्यंत आहे. करासह त्यासाठी 12,980 रुपये ते 17,110 रुपये मोजावे लागू शकतात. अपार्टमेंटचे भाडे रुमनुसार आहे. वन बेडरुम ग्रँड अपार्टमेंटचे एक दिवसाचे भाडे 34,000 रुपये आहे. तर कर आणि इतर शुल्कासह हे भाडे 40,120 रुपये होते.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले, आता त्या फोनने काही...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? राजकारणात नव्या...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या रणनीतीची चर्चा!
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग