AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या मिसाईलने अभिनंदन वर्धमान यांनी पाकचे एफ-16 पाडले होते, ते आता भारतात तयार होणार

भारतीय वायू सेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी आपल्या मिग - 21 मधून मिसाईलद्वारे पाकचे F - 16 हे जेट फायटर पाडले होते. ज्या मिसाईलद्वारे ते पाडण्यात आल होते. ते मिसाईल आता भारतात तयार होणार आहे.

ज्या मिसाईलने अभिनंदन वर्धमान यांनी पाकचे एफ-16 पाडले होते, ते आता भारतात तयार होणार
R -73 E air to air missileImage Credit source: socialmedia
| Updated on: Nov 01, 2023 | 2:51 PM
Share

मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : साल 2019 रोजी पाकिस्तानी F-16 फायटर जेट सीमेवर उडताना दिसल्याने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यावर त्यांना हुसकविण्याची जबाबदारी सोपविली होती. भारतीय वायू सेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी आपल्या मिग-21 फायटर जेट मधून R -73 या हवेतून हवेत डागता येणाऱ्या मिसाईलने पाकिस्तानी फायटर जेट पाडले होते. आता हे R -73 मिसाईल सरकार देशातच तयार करणार आहे. सध्या या मिसाईलला रशियाची टॅक्टीकल मिसाईल कॉर्पोरेशन तयार करीत आहे.

भारतीय वायूसेनेच्या फायटर जेटसाठी R – 73 च्या लेटेस्ट व्हर्जनची गरज आहे. हे मुळचे रशियन मिसाईल असून त्याचे  लेटेस्ट व्हर्जन R – 73 E देशात तयार होणार आहे. आत्मनिर्भर मोहिमेंतर्गत मेक – 3 प्रोजेक्ट अंतर्गत हे मिसाईल देशातच तयार केले जाणार आहे. मिसाईलचे हे लेटेस्ट व्हर्जनची रेंज 30 किलोमीटर आहे. या मिसाईलमध्ये RVV-MD टेक्नॉलॉजीचा वापक केला आहे. ज्याच्या मदतीने त्याचा पल्ला वाढवून 40 किलोमीटर करण्यात येणार आहे. हे मिसाईल डॉग फायटरसाठी तयार केले आहे. दिवस असो वा रात्र कोणत्याही हवाई टार्गेटला कोणत्याही दिशेने हे मिसाईल लक्ष्य करु शकते. या मिसाईलला फायटर जेट्स, बॉम्बवर्षक किंवा अटॅक हेलिकॉप्टरवर देखील लावाता येऊ शकते.

30 किलोमीटर उंचीपर्यंत उडते

या मिसाईलला कम्बाईन्ड गॅस एअरोडायनामिक कंट्रोल सिस्टीम लावली आहे. हे मिसाईल सरळ रेषेत जाताना टार्गेटप्रमाणे दिशा देखील बदलू शकते. त्याचा वेग 2500 किमी प्रति तास इतका आहे. ते 2 मीटर ते 20 किलोमीटर उंचीपर्यंत जाऊ शकते. तर किमान 30 किलोमीटर उंचीपर्यंत ते जाऊ शकते.

विंग कमांडर सुरक्षित आले परत

विंग कमांडर अभिनंदन याचे मिसाईलने पाकिस्तानी F – 16 फायटर पाडले होते. यानंतर त्यांच्या मिग-21 फायटर जेटवर हल्ला झाल्याने अभिनंदन इजेक्ट करुन विमानातून पॅराशूटने पाकच्या हद्दीत पडले. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने त्यांना पकडले होते. त्यानंतर त्यांची सुरक्षित भारतात आणण्यात आले. या मिसाईलच्या ताकद पाहून आता तिला भारतातच तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Follow Us
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद