AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी…मुंबईची हवा अतिशय खराब

पंधरवड्यापूर्वी मुंबईतील हवेचा दर्जा दिल्ली महानगराहून अधिक खराब झाला होता. आता गेले तीन दिवस  एअर क्वालिटी इंडेक्सनूसार मुंबईतील हवा अतिशय खराब झाली आहे. श्वसनाचा विकार असलेल्यांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी...मुंबईची हवा अतिशय खराब
mumbai-air-pollutionImage Credit source: socialmedia
| Updated on: Nov 01, 2023 | 1:22 PM
Share

मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : गेले तीन दिवस मुंबईतील हवेची गुणवत्ता अतिशय खराब झाली आहे. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी नूसार वांद्रे येथील एअर क्लालिटी इंडेक्स 210 नोंदविला गेला आहे. मालाड पश्चिम येथील एअर क्वालिटी इंडेक्स 229 नोंदविला आहे. त्यामुळे मुंबईतील हवेचा दर्जा अतिशय खराब झाली असून मुंबईकरांनी घराबाहेर पडताना तसेच घरातही श्वसनाचे विकार होऊ नये काळजी घ्यावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने देखील एका जनहित याचिकेवर संबंधित यंत्रणांवर ताशेरे ओढले आहेत.

पंधरवड्यापूर्वी मुंबईतील हवेचा दर्जा दिल्ली महानगराहून अधिक खराब झाला होता. आता गेले तीन दिवस  एअर क्वालिटी इंडेक्सनूसार मुंबईतील हवा अतिशय खराब झाली आहे. चकाला-अंधेरी पूर्व येथील एअर क्वालिटी इंडेक्स 246 नोंदवला गेला असून त्यानूसार या विभागातील हवा अतिशय खराब झाल्याचे म्हटले जात आहे. तर माझगाव येथील एअर क्वालिटी इंडेक्स 207 नोंदवला असून बोरीवली पूर्व आणि वरळी येथे 144 असा मॉडरेट ( मध्यम स्वरुपाचा ) एअर क्वालिटी इंडेक्स नोंदविला गेला आहे.

मुंबईत सलग तीन दिवस हवेची गुणवत्ता ढासळली आहे. स्विस एअर मॉनिटर IQAir च्या आकडेवारीप्रमाणे सोमवारी दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यांचा जगातील सर्वाधिक प्रदूषित दहा शहरात समाविष्ठ झाली आहे. टॉप टेन प्रदुषित शहरात दिल्ली चौथ्या, मुंबई सातव्या आणि कोलकाता दहाव्या क्रमांकावर आहे.

मास्क लावण्याच्या सूचना

हवेची गुणवत्ता वाऱ्याच्या वेगाने हळूहळू सुधारण्याचा अंदाज असला तरी ज्यांना दम्याचा त्रास, किंवा श्वसनाचा विकार आहे त्यांनी अधिक काळजी घ्यावी असे म्हटले जात आहे. मुंबईकरांना घराबाहेर पडताना काळजी घ्यावी मास्क घालावा, घरात एअर प्युरिफायर सुरु करावे असे आयक्यएअरने म्हटले आहे.

बांधकामाच्या ठिकाणी काळजी

मुंबई महानगर पालिकेने 21 ऑक्टोबर रोजी मुंबईतील बांधकाम सुरु असलेल्या साईटवर पाण्याचे फवार मारून धुळ उडू नये याची काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. जर आवश्यक प्रतिबंधात्मक पाऊले उचलली नाही तर बांधकाम थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कन्स्ट्रक्शन साईटवर हिरव्या जाळ्या लावाव्यात किंवा ज्यूटची जाळी लावावी. अॅण्टी स्मोक गनचा बांधकाम स्थळी वापर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील टाटा पॉवर प्लांट आणि आरसीएफ प्लांट कडून प्रदूषणाच्या नियमांचे पालन होत आहे की नाही याचीही खातरजमा प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पालिका करीत आहे.

Follow Us
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...