AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केवळ गृहिणी नाही, त्या तर राष्ट्र निर्मात्या… महिलांच्या योगदानाची ‘सुप्रीम’ दखल.. तो निकाल वाचला का?

Supreme Court Verdict about Woman: गृहिणींची कोणीही दखल घेत नाही. बाईचा जन्म म्हणजे रांधा, वाढा, उष्टं काढा असा नाराजीचा सूर उमटत असतो. पण सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी गृहिणींच्या कामाची दखल घेतली आहे. त्यावर मोठी टिप्पणी केली आहे.

केवळ गृहिणी नाही, त्या तर राष्ट्र निर्मात्या... महिलांच्या योगदानाची 'सुप्रीम' दखल.. तो निकाल वाचला का?
सुप्रीम कोर्ट, गृहिणीImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 11, 2026 | 12:29 PM
Share

Supreme Court Verdict about Woman: गृहिणी, हाऊस वाईफ असं सांगताना काही महिला कचरतात. गृहिणींची कोणी दखल घेत नाही. स्त्री जन्म म्हणजे रांधा, वाढा आणि उष्टं काढा असं नाराजीचा सूरही उमटतो. पण सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात मोठी टिप्पणी केली आहे. त्यामुळे घराची जबाबदारी समर्थपणे निभावणाऱ्या महिलांना हायसे वाटेल. घरात सर्वांसाठी धावपळ करणाऱ्या देशातील लाखो महिलांसाठी कौतुकाची थाप न्यायालयाने दिली आहे. हे प्रकरण महत्त्वाचे आहे. त्यामुळे भविष्यात अनेक बदल होऊ शकतात.

त्या तर राष्ट्र निर्मात्या

अपघातात कुणाचा मृत्यू झाला तर त्याची कमाई, पगार, उत्पन्न यानुसार विमा कंपन्या नुकसान भरपाई देतात. पण जेव्हा गृहिणी, घरासाठी राबणाऱ्या हाऊस वाईफ यांचा अपघातात जीव जातो. तेव्हा मात्र भरपाईसाठी मोठा पेच निर्माण होतो. कारण त्यांची कमाई निश्चित नसते. आता सर्वोच्च न्यायालयाने गृहिणींचा अपघात झाल्यास नुकसान भरपाईसाठी मोठा फैसला सुनावला आहे. जेव्हा एखाद्या गृहिणीचा अपघातात मृत्यू होतो. तेव्हा भरपाईसाठी तिचे योगदान निश्चित करणे आवश्यक ठरते. गृहिणींचे योगदान केवळ तिच्या कुटुंबापुरते मर्यादीत नसते. तर मानव संसाधन विकास आणि राष्ट्र निर्मितीत तिचे योगदान मोठे असते. त्यामुळे त्यांना केवळ गृहिणी म्हणण्याऐवजी राष्ट्र निर्मात्या म्हणायला हवे.

गृहिणींच्या मृत्यूसाठी 30 हजार रुपये मासिक भरपाई

गृहिणी घरकाम करतात. कुटुंबाची काळजी घेतात. त्या कुटुंबाची देखभाल करतात. या सेवांचे आर्थिक मूल्य आहे. त्याकडे तुम्हाला कानाडोळा करता येणार नाही. अपघातग्रस्त गृहिणींच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मार्गदर्शक तत्व ही जाहीर केली आहेत. गृहिणींचा अपघाती मृत्यू झाल्यास 30 हजार रुपये महिन्याच्या हिशोबाने भरपाई निश्चित करावी असे न्यायालयाने स्पष्ट केले .

अपघातप्रकरणी दाखल याचिकेत मोठे निरीक्षण

वाहन अपघातासंबंधी दाव्यांशी संबंधित याचिकांवर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायमूर्ती संजय करोळ आणि न्यायमूर्ती एन. के. सिंह यांच्या खंडपीठाने मोठा फैसला सुनावला. घर सांभाळणाऱ्या गृहिणींचे योगदान केवळ घरापूरते मर्यादीत नाही. तर देश उभारण्यातही त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. मोटार अधिनियमातंर्गत भरपाई निश्चित करताना महिलांचा मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्वामुळे कुटुंबाची देखभाल करण्यास त्या असमर्थ ठरत असल्यास नुकसान होते. त्यामुळे भरपाई निश्चित करण्यासाठी त्यांचे योगदान ग्राह्य धरणे आवश्यक असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...