वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यासाठी कार्यवाही करा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राज्यांना निर्देश

आरोग्य मंत्रालयानं वैद्यकीय महाविद्यालये 1 डिसेंबरपासून सुरु करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश दिले. Union Health Ministry

वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यासाठी कार्यवाही करा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राज्यांना निर्देश
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 6:45 PM

नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्य सरकारांना वैद्यकीय महाविद्यालये 1 डिसेंबर किंवा त्यापूर्वीपासून सुरु करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. वैद्यकीय महाविद्यालये सुरु करताना कोरोना विषयक सर्व खबरदारीच्या उपाय योजनांची अमंलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेत. कोरोनामुळं मार्चपासून देशातील सर्व राज्यातील वैद्यकीय महाविद्यलये बंद करण्यात आली होती. केद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमांना शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी नॉन-कोविड बेडची पुरेशा प्रमाणात व्यवस्था करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. (The Union Health Ministry asked state governments to initiate steps for reopening of medical colleges)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यासाठी गृह मंत्रालयाकडून परवानगी घेतली आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोनाविषयक सर्व प्रकारच्या कार्यपद्धती ठरवून, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन वैद्यकीय महाविद्यालयं सुरु करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगने मेडिकल कॉलेज सुरु करावीत, असा अभिप्राय दिल्यानंतर केंद्रानं हा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय वैद्यकीय आयोगाकडे वैद्यकीय अभ्यासक्रमांना शिकणारे विद्यार्थी आणि महाविद्यालयांनी 2020 मधील इंटर्न विद्यार्थ्यांचे क्लिनीकल ट्रेनिंग पूर्ण झाले नाही तर आगामी काळात होणाऱ्या पदव्युत्तर नीट परीक्षेला पात्र ठरणार नसल्याचे कळवले होते. 2021-22 मधील पदव्युत्तर नीट परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 2020-21 या शैक्षणिक वर्षातील नवे सत्र 1 फेब्रुवारी 2021 पासून सुरु होणार आहे.

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 2020-21 मधील सत्र 1 जुलै 2021 पासून सुरु करण्यासाठी पीजी-नीट परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये घ्यावी लागणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय सुरु केल्यानंतर पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी नॉन-कोविड बेडची पुरेशा प्रमाणात व्यवस्था करावी. यामुळे पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्याना क्लिनीकल ट्रेनिंग पूर्ण करता येणार आहे. (The Union Health Ministry asked state governments to initiate steps for reopening of medical colleges)

केंद्रीय गृहमंत्रालयाची नवे दिशानिर्देश

देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना पाहायला मिळत आहेत. दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आदी राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयानं नवे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यांना कठोर पाऊल उचलण्याचे निर्देशही केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. हे दिशानिर्देश 1 ते 31 डिसेंबरपर्यंत लागू असणार आहेत.

  • सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक
  • सामाजिक अंतर राखणं गरजेचं
  • सतत हात धुणे आवश्यक
  • चित्रपटगृहात ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी
  • जलतरण तलावात एकावेळी एकाच खेळाडूला परवानगी
  • धार्मिक कार्यक्रम, खेळ यासाठी मोकळ्या मैदानात 200 जणांना परवानगी
  • बंद मोठ्या सभागृहात 100 जणांना परवानगी

संबंधित बातम्या: 

CORONA UPDATE | कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय!, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नवे दिशानिर्देश, राज्य सरकार काय निर्णय घेणार?

CORONA UPDATE | पंजाबमध्ये रात्री संचारबंदी, दंडाच्या रकमेतही मोठी वाढ!, महाराष्ट्रातही कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता

(The Union Health Ministry asked state governments to initiate steps for reopening of medical colleges)

Non Stop LIVE Update
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.