
अनेकांना जंगलामध्ये फिरण्याची आवड असते, अनेक जण विकेएंडला शेतात किंवा जंगलामध्ये फिरण्याचा मस्त प्लॅन बनवतात. जंगल सफारीचा आनंद घेत असताना आपल्याला विविध पक्ष्यांचे, प्राण्यांचे किटकांचे आवाज ऐकू येतात, रात्रीच्या वेळी असे आवाज ऐकण्याचं थ्रीलच वेगळं आहे. जंगलामध्ये फिरताना किंवा शेतात फिरताना फार काळजी घ्यावी लागते कारण तिथे अनेक विषारी आणि हिस्र प्राणी असू शकतात. असाच एक आवाज आहे, जो जर तुम्हाला कुठे ऐकू आला तर वेळीच सावध व्हा, हा आवाज साधारण कुकरच्या शिट्टीसारखा असतो.
जंगलामध्येच नाही तर शेताच्या ठिकाणी अगदी तुम्ही कुठे एखाद्या गावात असाल किंवा शहरातही कधी-कधी तुमच्या घरात अडचणीच्या जागी तुम्हाला असा आवाज ऐकू येवू शकतो. जर असा आवाज आलाच तर सावध व्हा, थेट त्या आवाजाच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करू नका. कारण हा आवाज दुसरा तिसरा कोणाचा नसून, घोणस प्रजातीच्या सापाचा असतो.
भारतामध्ये सापाच्या ज्या चार प्रमुख विषारी प्रजाती आढळून येतात, ज्याला आपण बिग फोर म्हणतो त्यामध्ये घोणस या सापाचा समावेश होतो. घोणस हा अत्यंत विषारी साप असतो. तसेच तो प्रचंड चपळ देखील असतो, त्याला जेव्हा धोका जाणवतो तेव्हा तो कुकरच्या शिट्टीसारखा आवाज काढतो, आणि तो इतका चपळ असतो की काही कळायच्या आत आपली शिकार समजून तुमच्यावर हल्ला करू शकतो, अनेक जण या सापाला अजगर म्हणून पकडण्याचा प्रयत्न करतात, मात्र अशी चूक करू नका, तुमच्या घरात कोणताही साप आढळला तर त्याची माहिती सर्वात आधी सर्वमित्रांना द्या.
घोणस साप हा अत्यंत विषारी साप आहे, मात्र वेळेत जर उपचार मिळाले तर तुमचा जीव वाचू शकतो. मात्र उपचार मिळण्यास जर उशिर झाला तर तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो. घोणस हा रानात, दगडांच्या फटीमध्ये, अडचणीच्या जागी असा कुठेही आढळू येतो, महाराष्ट्रात याचा वावर सर्वाधिक आहे. याला रसेल व्हायपर असं देखील म्हणतात.
घोणस कसा ओळखायचा?
घोणसच्या सर्व अंगावर तपकिरी किंवा फिकट पिवळ्या रंगाचे विशिष्ट आकाराचे ठिपके असतात जे शिपटीकडून तोडांकडे जाताना कमी -कमी होत जातात, हे सर्व ठिपके एका ओळीत असतात. घोणस दिसालाय साधारणपणे आजगरासारखाच दिसतो, मात्र तो आजगर नसतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)