Thousand ची स्पेलिंग तर T पासून सुरु होते, मग 5 Thousand दाखवण्यासाठी 5 K का वापरलं जातं? 99 टक्के लोकांना नाही माहीत

तुम्ही अनेकदा सोशल मीडिया, मोबाईल, यूट्यूब किंवा इंन्स्टाग्रामवर 1K,10K,100K किंवा 1M असे आकडे लिहिलेले पाहिलेच असतील, पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? की thousand हा शब्द दर्शवण्यासाठी K शब्द का वापरला जातो?

Thousand ची स्पेलिंग तर T पासून सुरु होते, मग 5 Thousand दाखवण्यासाठी 5 K का वापरलं जातं? 99 टक्के लोकांना नाही माहीत
Social media
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 30, 2026 | 10:03 PM

तुम्ही अनेकदा सोशल मीडिया, मोबाईल, यूट्यूब किंवा इंन्स्टाग्रामवर अनेकवेळा 1K,10K,100K किंवा 1M असे आकडे लिहिलेले पाहिलेच असतील. तु्म्ही जेव्हा सोशल मीडियावरील एखाद्या अकाऊंटला भेट देता, तेव्हा तिथे तुम्हाला त्या अकाऊंटला किती लोक फॉलो करतात? याचा आकडा K मध्ये दिसून येतो. उदाहरणार्थ 25K,50K असा. तसेच एका विशिष्ट व्हिडीओला किती व्हूज मिळाले आहेत, हे देखील K मध्येच सांगीतलं जातं. उदाहरणार्थ 2K, 5K असं. इथे K चा अर्थ असतो हजार. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? की हजारला इग्रंजीमध्ये थाउंजड असं म्हटलं जातं, ज्या शब्दाची सुरुवात T ने व्हायला पाहिजे, मग इथे हजारची सुरुवात K ने का केली जाते? हे K नेमकं कुठून आलं?

जर तुम्हाला K चा शोध घ्यायचा असेल किंवा आता सध्याच्या व्यवहारांमध्ये K चा अर्थ समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला इतिहासामध्ये डोकावं लागेल. के हा शब्द प्राचीन ग्रीक भाषेमधून आला आहे. त्या काळात हा शब्द गणितीय कालमापन पद्धतीसाठी वापरला जात होता. आजच्या काळात हा शब्द जसाच्या तसा घेण्यात आला आहे. आजच्या काळात देखील विविध व्यवहारामध्ये हा शब्द चांगलाच लोकप्रिय झाला आहे. जसं की 50K फॉलोअर्स, 5 k व्ह्यूज अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो.

Loading...

K या शब्दाची उत्पत्ति प्राचीन ग्रीक भाषेतून झाली. ग्रीक भाषेमध्ये हजार या शब्दासाठी ‘खिलियोई’ (Khilioi) या शब्दाचा वापर केला जायचा. त्यातूनच हा K शब्द घेण्यात आला आहे. हा शब्द आज एवढा लोकप्रिय झाला आहे की, आता आपण कोणत्याही व्यवहारासाठी K शब्दाचाच प्रयोग करतो.  जसं की 15 K, 20K, 40 K, 50 K असं, या शब्दाची मुळ उत्पत्ती ही ग्रीक भाषेमधून झाली आहे. मात्र त्यानंतर पुढे या शब्दाचा वापर एखाद्या गणितीय आकड्याची किंमत दाखवण्यासाठी वेगवेगळ्या भाषेत सरारासपणे होऊ लागल्याचं पहायला मिळतं.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us