या चार जागा आहेत सापांसाठी खास; इथेच अंडी देतात, या ठिकाणांपासून दूरच राहा

भारतामध्ये प्रमुख्यानं दोन प्रकारचे साप आढळून येतात, एक म्हणजे जे अंडी देतात. तर दुसरे जे आहेत ते थेट पिल्लांना जन्म देतात. परंतु साप अंडी देणारा असो, अथवा थेट पिल्लांना जन्म देणारा, साप आपल्या प्रजननाच्या काळात विशिष्ट जागेचीच निवड करत असतात.

या चार जागा आहेत सापांसाठी खास; इथेच अंडी देतात, या ठिकाणांपासून दूरच राहा
snake
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 08, 2026 | 8:03 PM

भारतामध्ये हजारो प्रजातीचे साप आढळून येतात, त्याच्यापैकी काही साप हे विषारी आहेत, तर काही साप हे बिनविषारी आहेत. मात्र आपल्या मनात सापांबद्दल एक भीती निर्माण झालेली असते. ही भीती अनेकदा अज्ञानातून येते, कारण सापांबद्दल आपल्याला फार काही महिती नसतं. दिसणारा प्रत्येक साप हा विषारीच आहे, असं आपल्याला वाटतं, त्यामुळे आपण अनेकदा सापांना मारून टाकतो. परंतु तसं न करता त्याची माहिती सर्पमित्रांना द्यावी. सर्पमित्र या सापांना पकडून सुरक्षित जागी निसर्गाच्या सानिध्यात सोडतील. कारण सापांना मारल्यामुळे दिवसेंदिवस त्यांची सख्या कमी होत चालली आहे. भारतामधून अनेक दुर्मिळ प्रजातीचे साप नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सापांची संख्या कमी झाल्यामुळे त्याचा निसर्गाच्या समतोलावर देखील परिणाम होत आहे. त्यामुळे साप दिसल्यास त्याला कधीही मारलं नाही पाहिजे, जसं सापाला मारलं नाही, पाहिजे, तसंच त्याला पकडण्याचा देखील प्रयत्न करू नका, कारण ते तुमच्या जीवावर बेतू शकतं. कारण साप विषारी आहे, की बिनविषारी हे आपल्याला माहिती नसतं, अनेक लोक तर आजगर समजून घोणस साप पकडतात. घोणस हा एक अत्यंत विषारी साप आहे. साप अंडी घालण्यासाठी किंवा पिल्लांना जन्म देण्यासाठी विशिष्ट जागेची निवड करतात.

आर्द्रता असलेली ठिकाणं – सापांना आर्द्रता असलेली ठिकाणी निवाऱ्यासाठी अनुकूल असतात. जिथे जास्त आर्द्रता तिथे साप असण्याची शक्यता तेवढीच जास्त असते. अशी ठिकाणं तुम्हाला तुमच्या घरात देखील आढळून येतील. जिथे सूर्ण प्रकाश नीट पोहचत नाही. सारखा ओलावा असतो, अशा ठिकाणी साप निवारा करतात, अनेकदा ते तिथेच अंडी देखील देतात. त्यामुळे अशा जागांपासून नेहमी सावध असलं पाहिजे, अशा जागा आपल्या घरात राहणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे.

Loading...

बांबूसारखी झाडं – साप अनेकदा निवाऱ्यासाठी बांबूसारख्या झाडांचा देखील आधार घेतात, कारण या झाडाच्या परिसरात गवत मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतं, तसेच बांबूचा पाला मोठ्या प्रमाणात जमिनीवर पडत असल्यामुळे त्यांना लपण्यासाठी पुरेशी जागा सापडते. तसेच या झाडाच्या परिसरात कायम ओलावा असल्यामुळे बेडकासारखे प्राणी देखील इथे येतात, त्यामुळे सापांना सहज शिकार सापडते.

बीळ – अनेकदा साप बीळात राहतात,काही साप बीळात देखील अंडी देतात. अनेकांना उंदराच्या बिळातील आणि सापाच्या बिळातील फरक कळत नाही, मात्र हा फरक लक्षात घेतला पाहिजे.

झाडं – काही साप तर चक्क झाडावर देखील अंडी घालतात. असे फार थोडे साप आहेत, जे झाडावर अंडी घालतात. मात्र तरी देखील अशा काही प्रजाती आहेत, ज्या अंडी झाडावर घालतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us