हे झाड म्हणजे सापांचा हॉटस्पॉट, तिथेच अंडी घालतात, तुमच्याही परिसरात आहे का?

पावसाळ्याचा काळ हा सर्वसामान्यपणे सापांच्या प्रजननाचा हंगाम असतो, या काळात काही साप हे अंडी घालतात, तर काही साप हे थेट पिल्लांना जन्म देतात. अंडी देण्यासाठी किंवा पिल्लांना जन्म देण्यासाठी साप नेहमी सुरक्षित जागा शोधत असतात.

हे झाड म्हणजे सापांचा हॉटस्पॉट, तिथेच अंडी घालतात, तुमच्याही परिसरात आहे का?
Snake egg
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 06, 2026 | 8:35 PM

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. पावसाळ्यामध्ये अनेकदा तुम्हाला तुमच्या घराच्या परिसरात किंवा कॉलनीमध्ये साप आढळून आले असतील. तुम्ही कधी हा विचार केला आहे का? साप पावसाळ्याच्या काळातच जास्त प्रमाणात का दिसतात. त्याची दोन कारणं आहेत, एक म्हणजे हा काळ सापांच्या प्रजननाचा हंगाम असतो. साप सुरक्षित ठिकाण पाहून अंडी देतात तर काही साप हे थेट पिल्लांना जन्माला घालतात. साप जिथे अंडी देतो, त्या परिसरात जोपर्यंत अंड्यांमधून पिल्लं बाहेर येत नाहीत, तोपर्यंत त्यांचा तिथे कायम वावर असतो. त्यामुळे तुम्हाला त्या परिसरात अनेकदा साप आढळून येतो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पावसाळ्यात सापांच्या बिळात पाणी शिरतं, त्यामुळे ते बाहेर पडून सुरक्षित निवाऱ्याचा शोध घेत असतात, त्यामुळे देखील तुम्हाला पावसाळ्यात अनेकदा साप दिसून येतात.

पावसाळा हा सापांच्या प्रजननाचा काळ असतो, परंतु पावसाळ्यात सर्वत्र ओल असते, त्यामुळे साप अंडी घालण्यासाठी नेहमी सुरक्षित जागेच्या शोधात असतो. साप आपली अंडी अशा ठिकाणी घालतो, जिथे पावसापासून आणि इतर गोष्टींपासून अंड्यांचं रक्षण होईल, अशा वेळी अशा काही विशिष्ट प्रकारच्या वनस्पती आणि झाडं आहेत, जे सापांना सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्याचं काम करतात. साप अंडी घालताना अशाच वनस्पतींची निवड करतो, सापांना जगण्यासाठी नेहमी आर्द्रतायुक्त हवामानाची गरज असते.

यातीलच एक झाड आहे, ते म्हणजे गवती चहा, हा गवती चहा तुम्ही जेव्हा तुमच्या कुंडीमध्ये लावता, तेव्हा त्याची वाढ नियंत्रणात होते. त्यामुळे तिथे सापांचा फार काही धोका नसतो, परंतु जेव्हा तुम्ही हा गवती चहा तुमच्या शेतात किंवा बागेत लावता, तेव्हा त्याची वाढ अनियंत्रित होते. जमीन पूर्णपणे झाकली जाते आणि सापांना लपण्यासाठी सुरक्षित जागा सापडते. जमीन पानांमुळे नेहमी झाकलेली असल्यामुळे तिथे आर्द्रता देखील पुरेशा प्रमाणात असते, त्यामुळे अनेकदा साप या वनस्पतीच्या आश्रयाला येतात. तसेच इथे सापांची अंडी देखील सुरक्षित राहतात, त्यामुळे साप अंडी घालण्यासाठी देखील अशाच वनस्पतींची निवड करतो.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us